BSNL Network : बीएसएनएलच्या खंडित सेवेमुळे नागरिकांना नाहक त्रास

पोस्टातील सेवा महिनाभरापासून बंद; पोस्ट आणि बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव
Due to the interrupted service of BSNL citizens are suffering katraj marathi news
Due to the interrupted service of BSNL citizens are suffering katraj marathi newsSakal

कात्रज : भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) खंडित सेवेमुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. इंटरनेट सेवा बंद असल्याने महिनाभरापासून कात्रज पोस्ट कार्यालयातील सेवा बंद असल्याने ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

याबाबत पोस्ट आणि बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येते. आम्ही याबाबत बीएसएनलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत इंटरनेट सुविधा सुरळित करण्याबाबत प्रयत्न करत असल्याचे पोस्ट खात्याकडून सांगण्यात येत आहे. तर, पोस्ट कार्यालयात इंटरनेट सेवा बंद असल्याची कुठलीही माहिती प्राप्त झालेली नसल्याचे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

पोस्ट खात्यातील इंटरनेट सेवा बंद असल्याने पोस्ट खात्यांतील अधिकाऱ्यांकडून दोन दिवसांनी किंवा चार दिवसांनी येण्याचे ग्राहकांना सांगण्यात येते. यातून ग्राहकांमध्ये पोस्ट खात्याविष्यी नाराजी उमटत आहे. याबाबत पोस्ट खात्याने लवकरात लवकर तोडगा काढून ग्राहकांना योग्य तो न्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे.

आम्ही याबाबत बीएसएनलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत असून राजस सोसायटी चौकात सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी खोदाई करण्यात येत आहे. त्याठिकाणी होत असलेल्या खोदाईमुळे वायर तुटण्याच्या घटना घडत असून इंटरनेट सेवा खंडित होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

- रविंद्र देवकर, जनसंपर्क अधिकारी, पोस्ट खाते, पुणे विभाग

Due to the interrupted service of BSNL citizens are suffering katraj marathi news
BSNL: बीएसएनएलला अखेरची घरघर? जैतापूरात इंटरनेट सेवा कोलमडली..

मुदत संपली म्हणून मी पोस्टात पैसे काढण्यासाठी १५ दिवसांपासून चकरा मारत आहे. मात्र, इंटरनेट सेवा खंडित असल्याचे कारण सांगण्यात येते. मला पैशाची गरज आहे. मात्र, अशावेळी कारण सांगून अडकविण्यात येत असल्याने माझेच पैसे मला मिळत नाहीत. त्यामुळे मनस्ताप होत आहे.

- नथुराम शिरके, ग्राहक

पोस्ट खात्याकडून आमच्याकडे इंटरनेट बंद असल्याची कुठलीही माहिती प्राप्त झालेली नाही. अशा प्रकारची सेवा खंडित होण्याची कोणती अडचण असेल तर पोस्टाकडून तसे कळविल्यास दुरुस्त करून देण्यात येईल.

- प्रदीप चव्हाण, कनिष्ठ दूरसंचार अधिकारी , बीएसएनएल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com