वेळीच मदतीमुळे पोलीस कर्मचाऱ्याला मिळाले उपचार | Treatment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police
वेळीच मदतीमुळे पोलीस कर्मचाऱ्याला मिळाले उपचार

वेळीच मदतीमुळे पोलीस कर्मचाऱ्याला मिळाले उपचार

उंड्री - काळेपडळ येथे (रवी पार्क, डी.पी. रोड) ७ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटेच्या सुमारास टेम्पोच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याला अपघात झाला. दिया फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णवाहिकेत उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वानवडी पोलीस स्टेशनच्या महंमदवाडी पोलीस चौकीचे अभय अशोक दीक्षित असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. वानवडी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापती पदी ॲड.हेमंत नरुटे

दिया फाउंडेशनचे इम्रान शेख म्हणाले की, अपघातात पोलीस कर्मचारी दीक्षित रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती साहिल शेख व हुजेफा शेख यांना समजली. त्यांनी तातडीने दीक्षित यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिकेत त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. यावेळी डॉक्टर म्हणाले की, दहा-पंधरा मिनिटे उशीर झाला असता तर अघटित घडले असते. वानवडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी साहिल शेख व हुजेफा शेख यांचा सत्कार केल्याचे त्यांनी सांगितले. वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

loading image
go to top