Indapur पंचायत समितीच्या उपसभापती पदी ॲड.हेमंत नरुटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापती पदी ॲड.हेमंत नरुटे

इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापती पदी ॲड.हेमंत नरुटे

इंदापूर : इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापती पदी ॲड. हेमंत नरूटे यांची बिनविरोध निवड झाली. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे ते कट्टर कार्यकर्ते आहेत. मावळते उपसभापती संजय देहाडे यांनी ठरलेला कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा दिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा बारामती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, गट विकास अधिकारी विजयकुमारपरीट, सहाय्यक गटविकास अधिकारी रामचंद्र शिंदे यांनी उप सभापती निवडीसाठी बैठक बोलावली होती.

हेही वाचा: छापे मारणारे आले तर त्यांचे स्वागतच करु - नवाब मलिक

यावेळी उपसभापतीपदासाठी ऍड हेमंत नरुटे यांचाच एकमेव अर्ज आला तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने ऍड. नरुटे यांची बिनविरोधनिवड झाल्याचे घोषित करण्यात आले.यावेळी सभापती स्वाती शेंडे,माजी सभापती पुष्पा रेडके, करणसिंह घोलप, देवराज जाधव, सुवर्णा रणवरे, ऍड. हेमंत नरुटे, प्रदिप जगदाळे, प्रदिप काळे,सतीश पांढरे, सारिका लोंढे, शैला फडतरे, रोहिणी घोगरे हे सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा: पुण्यात ईडीचे 7 छापे; नवाब मलिकांच्या खात्यासंबंधी चौकशीला वेग?

निवडीनंतर त्यांचा मावळते उपसभापती संजय देहाडे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ऍड. हेमंत नरुटे म्हणाले, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सभापती पदी यापूर्वी पुष्पा रेडके यांना संधी दिली होती.त्यानंतर मला उपसभापती पदाची संधी देऊन धनगर समाजाचा सन्मान केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचा नावलौकिक वाढविण्यासाठी कटिबद्ध आहे.

loading image
go to top