चुकीच्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांकडून हवामान विभागाला टाळे

farmer
farmer

पुणे : हवामान विभागाच्या चुकीच्या मॉन्सूनच्या अंदाजामुळे मराठवाड्यात दुष्काळ पडला असून, पिक विम्याचे देखील हजारो कोटी रुपये मिळत नसल्याचा आरोप करित माजलगाव (जि.बीड) येथील शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने पुण्यातील हवामान विभागाच्या कार्यालयाला सोमवारी (ता.१५) टाळे ठोकुन ठिय्या आंदोलन केले.

 यावेळी हवामान विभागाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. विमा कंपन्या शेतकऱ्यांसोबत दगाबाजी करत आहे. हवामान विभाग आणि विमा कंपन्यांचे लागेबंधे असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे. 

''मराठवाड्यातील हवामान विभागाने दिलेल्या चुकीच्या मॉन्सूनच्या अंदाजामुळे मराठवाड्याचा दुष्काळवाडा झाला आहे. सोयाबीन, कापुस, तुर, ऊस ही सगळी पिक गेली आहेत. शेतकरी आता आत्महत्येच्या परिस्थितीत आहे. पण शेतकरी आता आत्महत्या करणार नाही, हरणार ना, तर लढणार आहे. हवामान खात्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवणार आहे. हे हवमान खाते आम्हाला नको. हे हवमान खाते बंद करा''
- गंगाभीषण थावरे, शेतकरी, शेतकरी संघर्ष समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com