शिवनेरीसह सात किल्ल्यांवर एकाच दिवशी दुर्गपुजा

दत्ता म्हसकर
रविवार, 24 फेब्रुवारी 2019

जुन्नर : दुर्ग-संवर्धन करणाऱ्या शिवाजी ट्रेल संस्थेने आज रविवार (ता.२४) राज्यातील १३१ किल्ल्यांवर दुर्ग पूजेचे आयोजन केले होते. जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीसह, नारायणगड, हडसर, निमगिरी, जीवधन, चावंड, सिंदोळा या सात किल्ल्यावर आज दुर्गपूजा करण्यात आली.

'शिवनेरी'वर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सकवार बाईसाहेब यांच्या माहेरच्या गायकवाड घराण्यातील वंशज संतोष गायकवाड सरदार (दावडी निमगाव) व शिवाजी ट्रेल,जुन्नर ग्रुप यांच्या उपस्थितीत दुर्गपूजा करण्यात आली. किल्ले 'हडसर' वर नागपूरकर भोसले सरकार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

जुन्नर तालुका फुटबॉल असोसिएशनचे प्रशांत बेलवटे व नारायणगड दुर्ग संवर्धन समितीने 'नारायणगडा'वर, किल्ले 'चावंड'वर हिस्टरी क्लब खामगाव, किल्ले 'जीवधन' वर प्राध्यापक आर्ट्स कॉमर्स व सायन्स महाविद्यालय नारायणगाव,  आकाश कांबळे व विद्यार्थी यांनी किल्ले 'निमगिरी' वर आशिष कांबळे व सहकारी, किल्ले 'हडसर' वर  मरहट्टे सह्याद्रिचे अमोल ढोबळे ग्रुप यांनी तर किल्ले 'सिंदोळा' वर मढ ग्रुपच्या वतीने दिपक काळे यांच्या सहभागातून दुर्ग पूजा करण्यात आली.

याप्रसंगी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुर्ग पूजा संपन्न होण्यासाठी जुन्नर तालुक्यातील शिवाजी ट्रेलचे विश्वस्त विनायक खोत, हिस्टरी क्लब जुन्नरचे अध्यक्ष विजय कोल्हे व शिवाजी ट्रेलचे उपाध्यक्ष रमेश खरमाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Durg Puja on seven FORT along with Shivneri on the same day