लैंगिक छळ रोखण्यासाठी दुर्गा मंच

दिलीप कुऱ्हाडे 
सोमवार, 21 मे 2018

पुणे - कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी आता सरकारी राजपत्रित अधिकारी महासंघाने पुढाकार घेतला आहे. महासंघाने राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत ‘दुर्गा मंच’ची स्थापना केली आहे. त्यामुळे सरकारी, निमसरकारी आणि खासगी ठिकाणी महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी महिलांचा सपोर्ट गट कार्यरत असणार आहे.

राज्यातील सरकारी कार्यालयांतील राजपत्रित वर्ग एक व दोनच्या महिला अधिकाऱ्यांच्या महासंघाने कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी कंबर कसली आहे. महासंघाने बहुतेक जिल्ह्यात दुर्गा मंचची स्थापना केली आहे. 

दुर्गा मंचमध्ये शासनाच्या विविध विभागांतील अकरा महिलांचा समावेश आहे. यामध्ये महिला व बालविकास, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभाग, जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग, सरकारी रुग्णालयातील महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांवरील अत्याचाराला आळा घालणे, महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मागण्या सरकारकडे पाठविणे, महिलांना बालसंगोपनासाठी रजा देणे यासाठी दुर्गा मंच सपोर्ट गट म्हणून कार्यरत असणार आहे. ज्या सरकारी, निमसरकारी आणि खासगी कार्यालयांत महिला अत्याचार समित्या स्थापन झाल्या नाहीत किंवा निष्क्रिय आहेत त्या पुन्हा कार्यरत करणे. अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठीही दुर्गा मंच पुढाकार घेणार आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह महत्त्वाच्या बहुतेक जिल्ह्यांत दुर्गा मंचची स्थापना केली आहे. मुंबईतील वैद्यकीय शिक्षण विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सोनाली कदम या मंचच्या राज्याच्या अध्यक्षा आहेत, तर पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा महिला व बाल विकास आयुक्तालयातील सहायक आयुक्त सुवर्णा पवार या आहेत.

पीडित महिलांना कामाच्या ठिकाणी असलेल्या लैंगिक प्रतिबंधक समितीमध्ये प्रतिसाद मिळत नसेल किंवा तेथील समिती कार्यरत नसल्यास त्यांनी दुर्गा मंचचे सहकार्य घ्यावे. त्यांना सर्वतोपरी न्याय मिळवून दिला जाईल.
- सुवर्णा पवार, अध्यक्षा, पुणे जिल्हा, दुर्गा मंच

Web Title: durga manch Sexual harassment control