
विश्रांतवाडी(पुणे) : लॉकडाऊन काळातदेखील लोहगावसह संपूर्ण परिसरात सर्व व्यवहार सुरळीत चालू असल्यासारखी आजची परिस्थिती आहे. इकडे पेट्रोलपंपावर सरसकट सर्वांनाच पेट्रोल-डिझेल दिले जात आहे. भाजी, किराणा, मेडिकल इ.बरोबर दारू, गुटखादेखील सर्वत्र सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन करूनदेखील लोहगावसह परिसरात सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू असून जे लोकांना हवं आहे ते सहज मिळत आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
गावठी दारू पिण्यासाठी तर सायंकाळच्या वेळी गर्दी होत आहे. वाघोली रस्ता, धानोरी रस्ता, मुख्य चौक, वडगावशिंदे अशा सर्व रस्त्यांवर वाहनांची गर्दी नेहमीप्रमाणे पाहायला मिळत आहे. पेट्रोल, डिझेल, दारु, गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने ते मिळवण्यासाठी वाहने दैनंदिन वाहनांप्रमाणे रस्त्यावरून धावत आहेत.
Coronavirus : पुणेकरांची घरपोच आरोग्य तपासणी; महापालिकेची मोहीम
दिल्ली येथील निजामुद्दीन तबलिगी ए जमातच्या मेळाव्याला, येरवडा, लोहगाव, खराडीमधील काही लोक सहभागी झाले होते. त्या दृष्टीने सर्वांनी जास्त काळजी घेणे आवश्यक असताना तसे होताना दिसत नाही. पोलीस यंत्रणादेखील आपली भूमिका सक्षमपणे पार पाडत नसल्याने लोहगावमध्ये सध्या तरी जनजीवन सुरळीतपणे सुरू असल्याचे म्हणावे लागेल.
स्वयंपाक, धुणीभांडी करणाऱ्या महिलांसह 'यांना' मिळणार आर्थिक सहाय्य
गुटखा पोहोचतो दुकानात
सर्वत्र लॉकडाऊन असताना, पोलिसांची नाकाबंदी असतांना, रस्ते निर्मनुष्य असताना लोहगावसह परिसरात एक जण दुचाकीवरून गुटखा सर्व दुकानात नियमितपणे पोहचवत असतो. गाडीवर पोती ठेवून खुलेआम गुटखा विकताना पोलिसांना दिसत नसेल का अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.