esakal | बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी; अजित पवारांकडून दहा व्हेंटिलेटर्स

बोलून बातमी शोधा

ajit pawar

बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी; अजित पवारांकडून दहा व्हेंटिलेटर्स

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती.

बारामती : गेल्या काही दिवसात बारामतीत व्हेंटीलेटर्सची कमतरता भासत असल्याने अनेक रुग्णांचे हाल झाले, ही कमतरता लक्षात घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने बारामतीसाठी दहा व्हेंटिलेटर्स उपलब्ध करुन दिले. बारामतीत गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. त्यामुळे रुग्णालयांवरचा ताणही कमालीचा वाढला होता. अनेकांची तब्येत अचानकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटर्सची गरज लागत होती, मात्र प्रत्येक रुग्णालयातील व्हेंटिलेटर्सची संख्या अत्यंत मर्यादीत असल्याने अनेकांना व्हेंटिलेटर्स बेड मिळत नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयात लक्ष घालून बारामतीसाठी दहा बेला व्हिस्टा या कंपनीचे व्हेंटिलेटर्स तातडीने उपलब्ध करुन दिले. आज हे दहाही व्हेंटिलेटर्स बारामतीत आले. या पैकी काही व्हेंटिलेटर्स शासकीय रुग्णालयांना तर काही खाजगी रुग्णालयांना दिले जाणार आहेत.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर

रुग्णाला व्हेंटिलेटर्सची विनामूल्य सुविधा मिळावी अशी या मागची भावना आहे. बारामतीत दहा व्हेंटिलेटर्स अजित पवार यांच्या माध्यमातून उपलब्ध झाल्यामुळे आता बारामतीतील व्हेंटिलेटर्स बेडची संख्याही दहाने वाढणार आहे, त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे. बारामती गेल्या काही महिन्यात मेडीकल हब म्हणून उदयास आले असून बारामतीत इंदापूर, दौंड, पुरंदर, फलटण, अकलूज, माळशिरस, राशीन, कर्जत या भागातील रुग्णही मोठ्या संख्येने उपचारासाठी येत आहेत. सरकारी रुग्णालयात सीटी स्कॅनची गरज-बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयासह शासकीय महिला रुग्णालयातही सीटी स्कॅन यंत्राची सध्या नितांत गरज आहे. रुग्णांना शासकीय दराने स्कॅन मिळाल्यास रुग्णांचे पैसे वाचण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा: पुणे : वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता जैववैद्यकीय कचऱ्यासाठी विघटन प्रकल्प