जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

वडगाव शेरी येथील विवाहित तरुणाचा खराडी बायपास येथे नव्याने झालेल्या खाजगी जलतरण तलावमध्ये बुडून मृत्यू झाला. अविनाश शिवशरण (रा. सोमनाथनागर, वडगाव शेरी) असे त्या तरुणाचे नाव असून तो चंदननगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे काम करत होता.

वडगाव शेरी (पुणे) - वडगाव शेरी येथील विवाहित तरुणाचा खराडी बायपास येथे नव्याने झालेल्या खाजगी जलतरण तलावमध्ये बुडून मृत्यू झाला. अविनाश शिवशरण (रा. सोमनाथनागर, वडगाव शेरी) असे त्या तरुणाचे नाव असून तो चंदननगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे काम करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथे श्रीराम सोसायटी येथे एक खाजगी जलतरण तलाव झाला आहे. तेथे अविनाश आपल्या मित्रांसोबत मंगळवारी दुपारी पोहायला गेला होता. मित्र खोल पाण्यात पोहोत होते. त्यावेळी अविनाश बाजूला पोहोत होता. थोड्या वेळाने अविनाश बुडल्याचे मित्रांच्या लक्षात आले. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

अविनाश हा हँडबॉलचा खेळाडू होता. हँडबॉल संघटनेवर तो सचिव म्हणूनही काम करत होता. अविनाशचा शवविच्छेदन अहवाल आल्यावर या अपघाताचे कारण समजेल असे विमानतळ पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Dying in a swimming pool