मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी ‘ई-भूमिपूजन’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

पिंपरी - क्रांतिवीर चापेकर स्मारकाचा दुसरा टप्पा, वडमुखवाडीतील पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्प आणि मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ या तीन प्रकल्पांचे ‘ई-भूमिपूजन’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (ता. २३) सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. हा कार्यक्रम चिंचवड, केशवनगर येथील मोरया क्रीडांगण येथे होईल. 

या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे उपस्थित असतील.

वडमुखवाडी व मोशी येथे न जाता मुख्यमंत्री चिंचवड येथून एकाच जागेवरून ‘ई-भूमिपूजन’ करणार आहेत. त्यानंतर केशवनगर येथील मोरया क्रीडांगण येथे जाहीर सभा होईल. यापूर्वीदेखील पालिकेच्या विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘ई पद्धतीने’ झाले होते. त्यावरून सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका झाली होती. 

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, ‘‘भाजपच्या नेत्यांना शहराबद्दल आपुलकी, प्रेम नाही. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे प्रत्यक्ष कामाची पाहणी करून भूमिपूजन किंवा उद्‌घाटन करत. त्यांना हे शहर आपले वाटत असल्यानेच जागेवर जाऊन नागरिकांशी संवाद साधत. भाजपला आत्मीयता नसल्याने त्यांनी ही पद्धत बंद केली’’

मुख्यमंत्र्यांकडे कमी वेळ असल्याने ‘ई-उद्‌घाटन’ करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र अद्याप निश्‍चित केलेले नाही. या शहराच्या प्रश्‍नांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूर्ण जाणीव आहे.
- नितीन काळजे, महापौर

Web Title: E-bhoomibujan by chief minister