भेकराईनगर ते निगडी बीआरटी मार्गावर धावली ई-बस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पुणे : पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी पीएमपीच्या येऊ घातलेल्या ई-बसच्या चाचणीला सुरवात झाली आहे. त्यातील 9 मीटर लांबीच्या इलेक्‍ट्रिक बसची चाचणी नुकतीच पार पडली. तर, बीआरटी मार्गावरून धावणाऱ्या 12 मीटर लांबीच्या ई-बसची भेकराईनगर ते निगडी या मार्गावर मंगळवारी चाचणी घेण्यात आली. 

पीएमपीच्या ताफ्यात 500 वातानुकूलित ई-बस भाडेकराराने घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील 150 ई-बस खरेदी करण्याच्या निविदेला मान्यता देण्यात आली. यामध्ये 9 मीटर लांबीच्या 25, तर 12 मीटर लांबीच्या 125 बसचा समावेश आहे. यातील 12 मीटर लांबीच्या बस बीआरटी मार्गावर धावणार आहेत. ई-बसच्या चाचणीला सुरवात झाली असून, ओलेक्‍ट्रा कंपनीच्या 9 मीटर लांबीच्या बसची चाचणी नुकतीच पार पडली होती. आज मंगळवारी 12 मीटर लांबीच्या ई-बसची भेकराईनगर ते निगडी या मार्गावर चाचणी घेण्यात आली. या 31 किलोमीटरच्या मार्गावर पूर्ण दिवसभर ही चाचणी घेण्यात आल्याची माहिती पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी दिली. या गाडीची चाचणी पूर्ण झाल्यानंतर 9 मीटर आणि 12 मीटर लांबीच्या गाड्या पीएमपीच्या ताफ्यात येणार आहेत. तसेच, टाटा कंपनीचीही ई-बस लवकरच चाचणीसाठी शहरात येणार आहे. 
 
Web Title: E-bus runs on Brihkarnagar from Nigdi BRT road