आळंदी पालिकेत सावळा गोंधळ; ई गव्हर्नन्स निवळ्ळ कागदावरच!

विलास काटे 
रविवार, 2 ऑगस्ट 2020


जन्ममृत्यूचे दाखले असो की, बांधकाम मंजूरीसाठीचा फाईल तुम्हाला किती वेळ लागेल हे कोणी सांगणार नाही. संगणकाच्या युगात सर्व सोयी असूनही  आळंदी पालिका मात्र मागासलेली आहे.

आळंदी : नागरी समस्या मांडण्यासाठी अथवा नागरी सुविधांसाठी पालिकेत अर्ज केला तर आवक-जावक विभागात अर्ज स्विकारला तरी रजिस्टरला नोंद केली जात नाही. परिणामी अर्जदार नागरिकांचे काम रखडले जाते. पालिकेतील प्रमुख विभाग ठेक्यातील कर्मचारी सांभाळत आहे. आवक-जावक विभागात अर्ज स्विकृतीसाठी कर्मचारी नसल्याने पालिका कार्यालयात सावळा गोंधळ असून ई गव्हर्नन्सचे कामकाज केवळ कागदावर असल्याचे चित्र आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यशासनाने गेल्या दहा वर्षात ई गव्हर्नन्सवर भर दिला. एक खिडकी योजना मोठा गाजावाजा करून सुरू केली. पालिका कार्यालयात प्रत्येक विभागाला स्वतंत्रपणे संगणक व्यवस्था पुरवली. आजही आळंदी पालिकेत संगणकासाठी लाखो रूपये खर्च केले जात आहे. मात्र संगणक असूनही अर्ज केला तर तत्काळ पोहोच अथवा माहिती मिळेल याची खात्री नाही. जन्ममृत्यूचे दाखले असो की, बांधकाम मंजूरीसाठीचा फाईल तुम्हाला किती वेळ लागेल हे कोणी सांगणार नाही. संगणकाच्या युगात सर्व सोयी असूनही आळंदी पालिका मात्र मागासलेली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक; शारदाताई टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन

सध्या आळंदी पालिका मुख्याधिकारी बदलले मात्र कार्यालयीन चित्र आहे तसेच आहे. गेल्या तीन वर्षात आळंदी पालिकेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा कर्मचाऱ्यांवर अंकूश नाही. यामुळे नागरिकांना अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे. सध्या अनेक कर्मचारी कामावर आहेत मात्र, नागरिकांचे काम होईल याची खात्री नाही. मालमत्ता उतारा असो मृत्यूचा दाखला. पाणीपुरवठा, आरोग्य विभाग, तसेच अन्य कारणांसाठी अर्ज केला तर, नोंदणी अभावी नागरिकांची कामे रखडली जात आहेत. नागरी सुविधांसाठी तक्रार अर्ज असो की, इतर प्रशासकिय कामकाजासाठीचे अर्ज असो. पालिकेत अर्जांची स्विकृती नोंदविण्यासाठी गेली काही दिवस कर्मचारीच नसल्याचे दिसून येते. आवक-जावकला अर्जांची नोंद होत नसल्याने नागरिकांच्या कामाचा खोळंबा होत असल्याचे चित्र आहे.

डिप्लोमाच्या प्रवेशाला मुहूर्त सापडेना; वेळापत्रकाकडे लागले विद्यार्थ्यांचे लक्ष!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका कार्यालयाच्या मुख्य दरवाजावरच नागरिकांना अडविले जाते. अर्ज द्यायचा असल्यास दरवाजात घेतला जातो पण, पोहोच दिली जात नाही. नंतर अर्ज आवक-जावकला नोंदविलाही जात नाही. अनेक कर्मचारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेर फिरताना दिसत आहे. पाणीपुरवठा समस्या अद्याप संपलेली नाही. आरोग्य विभागाचे तर तीनतेरा वाजले. कोरोनाचे रोज दहा बारा रूग्ण आढळून येत आहे.

बांधकाम विभागाचे अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकामाकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. शहरात डेंगी, चिकूनगुणियाचे रूग्णांबरोबरच कोरोनाने थैमान घातले. मात्र तरीही औषध फवारणी प्रभावी नसल्याची नागरिकांची ओरड आहे. एकंदर पालिकेत सध्या सावळा गोंधळ असल्याचे दिसून येते. पालिकेचे अनेक विभाग ठेक्यावर घेतलेले कर्मचारीच सांभाळत आहे. मालमत्ता उतारा, पाणीपुरवठा, करभरणा यासारखी मुख्य कामेही ठेक्यावरील कर्मचारी करत आहेत. ठेक्यातील कर्मचारी गैरहजर असल्यावर होणारे कामही आणखी लांबणीवर पडत असल्याचे चित्र आहे. राज्यातील मोठे तिर्थक्षेत्र असलेल्या आळंदी पालिकेचा कारभार सध्या ठेक्यातील कर्मचाऱ्यांवर सर्वस्वी अवलंबून असल्याचे चित्र आहे. प्रशासकीय शिस्त नसल्याने सावळागोंधळ दिसून येत आहे.

परीक्षा घेताना 'एमपीएससी'चीच लागणार कसोटी; उमेदवारांसाठी घेतला 'हा' निर्णय!​
याबाबत मुख्याधिकारी अंकूश जाधव यांनी सांगितले की,''पालिकेत आवक-जावकला कर्मचारी नेमलेले आहेत. नागरिकांच्या याबाबत तक्रारी असतील तर प्रशासनाशी संपर्क साधावा. नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांनी पालिकेत गेल्यावर चौकशी करते;;


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: E-Governance in Alandi Municipality only on paper