

Maharashtra E Praman Portal To Help Banks Verify Property Documents Online And Reduce Home Loan Fraud With Blockchain
sakal
पुणे : नागरिकांना सर्टिफाईड दस्त (प्रमाणित प्रत) घरबसल्या ‘ई-प्रमाण’ या पोर्टलवर उपलब्ध करून दिल्यानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने आणखी एक पाऊल पुढे टाकत हे पोर्टल बँकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घरावरील कर्जासाठी नागरिकांनी अर्ज केल्यानंतर त्यांनी सादर केलेला दस्त खरा आहे का, यांची सत्यता पडताळणी करणे बँकांना शक्य होणार आहे. त्यामुळे बँकांना कर्ज वाटप करताना, तर नागरिकांना विनाविलंब कर्ज मिळण्यास मदत होणार आहे.