शांतता, सुख-समृद्धीसाठी प्रार्थना

पुणे कॅंटोन्मेंट - ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त बुधवारी काढण्यात आलेली भव्य मिरवणूक.
पुणे कॅंटोन्मेंट - ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त बुधवारी काढण्यात आलेली भव्य मिरवणूक.

पुणे - शहरात जश्‍न -ए-ईदमिलादुन्नबी उत्साहात साजरी करण्यात आली. मौलाना सय्यद मोहम्मद हाशिमिया यांच्यासह हजारो नागरिकांनी बुधवारी सकाळी एकत्र येत देशात शांतता, सुख - समृद्धी नांदावी, यासाठी नाना पेठेतील मन्नूशा मस्जिद येथे प्रार्थना केली. मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसानिमित्त हाशिमिया यांनी पैगंबर यांच्या शिकवणुकीसंदर्भातला संदेश नागरिकांना सांगितला. तसेच ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या.

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, अमानुल्ला खान, रफिकउद्दीन शेख तसेच ॲड. अभय छाजेड, ॲड. ए. रहमान, मुश्‍ताक पटेल आदी मान्यवरांनीही उपस्थित राहून नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यानंतर हाशिमिया यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढण्यात आली. 

नागरिक व लहान मुले नटून थटून अत्यंत उत्साहात मिरवणुकीत सहभागी झाली होती. मन्नूशा मशिदीपासून निघालेली मिरवणूक संत कबीर चौक ते कुरेश मस्जिद, एम. जी. रस्ता मार्गाने सिटी जामा मशिदीकडे मार्गस्थ झाली. हजरत बाबाजान चौकात व शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये मिरवणुकीचे जंगी स्वागत करण्यात आले. सिटी जामा मस्जिद येथे मौलाना सय्यद मोहम्मद हाशिमिया यांच्या प्रबोधनपर भाषणाने मिरवणुकीची सांगता झाली. 

यावर्षी मोहम्मद पैगंबर यांची जयंती साजरी करताना डीजेचा वापर करू नये, तसेच रस्त्यावर मोठे स्टेज बांधून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये, यासाठी सीरत कमिटीने विविध मंडळांना आवाहन केले होते. त्याला अनेक संस्था, मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्‍याचे रफिउद्दीन शेख यांनी सांगितले.

ईदनिमित्ताने मी रक्तदान केले, याचे खूप समाधान वाटते. डीजे, महागडी सजावट यावर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा लोकोपयोगी काम करणे म्हणजेच पैगंबर यांच्या शिकवणुकीचे, संदेशाचे पालन करणे असे मला वाटते. 
- शाहनवाज तारकश

डीजेचा खर्च टाळून मदत
‘सीरत कमिटीच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक तरुणांनी, मंडळांनी डीजेचा वापर करण्याऐवजी त्यावर होणाऱ्या खर्चातून लहान मुलांना मोफत खाऊ, फळे व पाणीवाटप केले. काही तरुणांनी नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिरे आयोजित केली होती. तर आय. टी. शेख या तरुणाने त्याच्या मित्रांसमवेत मोहंमद पैगंबर जयंतीला या वर्षी प्रथमच रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com