कमवा आणि शिकामध्ये ‘कमवा’

Pune-University
Pune-University

पुणे - ‘कमवा आणि शिका’ योजनेतंर्गत विद्यार्थ्यांनी दररोज काही तास काम केल्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यात मानधन जमा होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मात्र, बोगस विद्यार्थी दाखवून मानधनाची रक्कम लाटण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीला योजनेत आर्थिक अनियमितता झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे.

आर्थिक अनियमिततेची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली. या समितीमार्फत सध्या चौकशी सुरू आहे. कमवा आणि शिका योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज तीन ते चार तास काम देण्यात येते. त्यासाठी त्यांना प्रतितास ४५ रुपये मानधन मिळते. त्यातून साधारणत: दर महिन्याला तीन ते चार हजार रुपये विद्यार्थ्यांना मिळतात. सध्या विद्यापीठाकडील नोंदींनुसार सुमारे दीड हजार विद्यार्थी या योजनेत कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात मानधनाची रक्कम दरमहा जमा होते. मात्र, यामध्ये बोगस विद्यार्थ्यांच्या नावे बॅंक खात्यात रक्कम जमा होत असल्याचे उघड झाले आहे. 

उच्चस्तरीय समितीने या प्रकरणाशी निगडित सर्व कागदपत्रे मागवून घेतली असून, तपासणी सुरू केली आहे. प्रथमदर्शनी या प्रकरणात आर्थिक अनियमितता असल्याचे आढळून आले आहे. मात्र, या प्रकरणात कोणाचा सहभागी आहे? हे अद्याप समोर आलेले नाही. योजनेचा लाभ घेणाऱ्या जवळपास अकराशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यासोबत बॅंकेतील नोंदी तपासण्यात येणार आहेत. समितीचा अंतरिम अहवाल लवकरच विद्यापीठासमोर सादर होईल, असे सूत्रांनी सांगितले.

उच्चस्तरीय समितीचा अहवाल या आठवड्यात येईल. त्यावरून या प्रकरणाबाबत पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com