
Vaduj’s Oxygen Park glows with 400 eco-friendly water lamps during a sustainable Diwali celebration, inspiring community awareness.
Sakal
जुन्नर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात मध्ये गौरवलेल्या वडज ता.जुन्नर येथील ऑक्सिजन पार्कमध्ये पर्यावरणपूरक दिपोत्सव साजरा करण्यात आला. पर्यावरण प्रेमी वनरक्षक रमेश खरमाळे यांच्या कल्पनेतून हा प्रकल्प साकारत आहे.दीपोत्सवातून पर्यावरणाचे महत्त्व घरोघरी पोचविण्याच्या उद्देशाने येथे पर्यावरण पूरक ४०० पाण्याचे दिवे लावण्यात आले.यामुळे ऑक्सिजन पार्क दिपोत्सवानी उजळून निघाला होता.