मांजरीत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

Eco friendly Ganesh Workshop in manjari
Eco friendly Ganesh Workshop in manjari

मांजरी : इकोफ्रेंडली मूर्ती म्हणजे काय, ती कशी बनवतात. त्याचे रंगकाम कसे करतात असे नानाविध प्रश्न आणि त्याबाबत चिमुकल्यांना असलेल्या कुतुहलाची सोडवणूक झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडताना दिसला. निमित्त होते हडपसर येथील सिद्धेश्वर व शिवसमर्थ बहुउद्देशीय संस्थेने आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणेशमूर्ती कार्यशाळेचे.  पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा व त्याबाबत प्रबोधन होऊन मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी या संस्थांनी कार्यशाळेचे आयोजन केले.

महात्मा फुले वसाहतीमधील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ही  कार्यशाळा आयोजित केली होती. सुमारे 80 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. डॉ. गणपत शितोळे यांनी या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. शिवसमर्थ संस्थेच्या अध्यक्षा मनीषा वाघमारे व सिद्धेश्वर संस्थेचे डॉ. शंतनू जगदाळे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. 

प्रशिक्षणामध्ये मुलांनी शाडूमातीपासून आकर्षक गणेश मूर्ती तयार केल्या. मुलांनी बनविलेल्या गणेशमूर्ती पाहून पालकांनी त्यांचे कौतुक केले. शिवसमर्थ संस्थेच्या अध्यक्षा  वाघमारे यावेळी म्हणाल्या की, आपले सण उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक व्हावेत यासाठी आमचा प्रयत्न असतो. फटाके मुक्त दिवाळी, होळी, रंगपंचमीमध्ये नैसर्गिक रंगांचा वापर याबाबतही प्रबोधन केले जाते. त्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com