
"Unique eco-friendly verdict: Drunk and Drive accused planting trees as part of punishment."
esakal
जुन्नर: येथील लोक न्यायालयात मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांना (ड्रंक अँड ड्राईव्ह) आर्थिक दंडाबरोबरच वृक्षारोपण करण्याची शिक्षा देण्यात आली. या अनोख्या शिक्षेचे पर्यावरण प्रेमींकडून स्वागत होत आहे. सहदिवाणी न्यायाधीश अनंत बाजड यांनी ही शिक्षा ठोठावत न्यायदान प्रक्रियेत एक नवीन संकल्पना मांडली.