तयार करा पर्यावरणपूरक बाप्पा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

कार्यशाळेविषयी माहिती...
काय - सकाळ इको गणपती २०१९ 
कधी - रविवार (ता. १८)
केव्हा - सकाळी १० ते ११.३० 
शुल्क - ६० रुपये 
प्रवेश - सर्व वयोगटासाठी 
संपर्क - ८८०५००९३९५ किंवा ९५५२५३३७१३ 

महत्त्वाचे - नावनोंदणी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊनच करावी. फोनवर नोंदणी करता येणार नाही. कार्यशाळेसाठी जागा मर्यादित आहेत.

पुणे - प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदीपात्रात, विहिरीत विसर्जित करून ते पाणीसाठे दूषित करण्याऐवजी शाडूच्या गणेशमूर्ती पुजून नंतर त्या कृत्रिम जलकुंडात विसर्जित करणं ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांद्वारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना घराघरांत जावी व आपला लाडका बाप्पा स्वत:च्या हाताने तयार करण्याची संधी ‘सकाळ’ घेऊन येत आहे. त्यासाठी गणेशमूर्ती घडविण्यास शिकवणारी अभिनव कार्यशाळा १८ ऑगस्टला आयोजिली आहे.

गणपती बाप्पा हा प्रत्येक लहान मुलासाठी मोठा कौतुकाचा विषय असतो. पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने शाडू मातीपासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. लहानग्यांपासून मोठ्यांप्रमाणे सर्व वयोगटांसाठी ही कार्यशाळा होणार आहे. 

फिनिक्‍स मार्केटसिटी (विमाननगर), पाठशाळा (बालेवाडी, रहाटणी), क्‍लारा ग्लोबल स्कूल (घोरपडी), नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल (चिंचवड), सिटी प्राइड स्कूल (निगडी), अभिषेक इंटरनॅशनल स्कूल (मोशी), सीएम इंटरनॅशनल स्कूल (बालेवाडी), अभिरुची मॉल ॲण्ड मल्टिप्लेक्‍स (सिंहगड रस्ता), एडीफाय इंटरनॅशनल स्कूल (हिंजवडी), सिटी इंटरनॅशनल स्कूल (कोथरूड), सनशाइन प्री- स्कूल (आंबेगाव बुद्रुक) येथे सकाळी १० ते ११.३० वा. कार्यशाळा होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांनी येताना सोबत बसण्यासाठी मॅट, कंपास पेटी, पाण्याची बाटली, छोटा रुमाल, जुने वर्तमानपत्र, पेंटिंगचा ब्रश, बाउल, तिकीट सोबत आणावे. कार्यशाळेच्या ठिकाणी शाडू माती देणार असून तयार केलेल्या मूर्ती घरी नेता येतील. बाप्पाला दागिने तयार करण्यासाठी सोबत डाळी, कडधान्ये आणली तरी चालणार आहे. सहभागींना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eco Ganpati 2019 Workshop by Sakal