Eco-Garden : वानवडीतील इको- गार्डन लवकरच नागरिकांना होणार खुले

वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे पुणे महानगरपालिका व स्थानिक नागरिक यांच्या संयुक्तपणे इको-गार्डन तयार केले आहे.
Eco Garden
Eco Gardensakal

घोरपडी - वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे पुणे महानगरपालिका व स्थानिक नागरिक यांच्या संयुक्तपणे इको-गार्डन तयार केले आहे. महात्मा फुले सांस्कृतिक भवनच्या छतावर आठ हजार चौरस फुटांमध्ये हा प्रकल्प राबविला आहे. ज्यामध्ये तीनशे पेक्षा जास्त प्रकारच्या विविध वनस्पती आहेत.

यामध्ये फळभाज्या, पालेभाज्या, आयुर्वेदिक वनस्पती आणि विविध फुलांची झाडे असलेले फुलपाखरांची बाग, ऑक्सिझन झोनचा समावेश आहे. १४ फेब्रुवारीला पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून याची पाहणी व उद्घाटन केल्यानंतर ही बाग नागरिकांसाठी विनामूल्य खुला होणार आहे.

ही बाग तयार करताना जुन्या वस्तू वापरून 'टाकाऊ ते टिकाऊ' यानुसार वॉश बेसिन, बाथ टब, क्रेट, मातीचे मटके, जुनी सायकल, ड्रम आणि बांबू, वाळलेले गवत यांसारखे टाकाऊ साहित्य वापरले आहे. 'बेस्ट फ्रॉम वेस्ट' या थीमनुसार नागरिकांनी अशा टिकाऊ वस्तू फेकून न देता त्यामध्ये विविध फळे, भाजीपाला आणि फुलांची रोपे लावण्यासाठी कुंडी म्हणून पुनर्वापर करावा. यासाठी या जुन्या वस्तूपासून हे सुंदर गार्डन बनवले आहे.

या बागेत अर्जुन, बेहडा आणि शतावरी या औषधी वनस्पतीसह, फुलपाखरांच्या बागेत गुलाब, मोगरा, झेंडू आणि सूर्यफूल यांसारखी फुलांची झाडे आहेत, जी फुलपाखरांना आकर्षक करतात. स्पायडर प्लांट, स्नेक प्लांट, मोनी प्लांट यांसारखे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवणारी झाडे लावण्यात आली आहेत.

या प्रकल्पाचे प्रमुख वास्तुविशारद आशिष संकपाळ यांनी सांगितले, 'हे काम वर्षभरापूर्वी सुरू झाले असून टाकाऊ वस्तूपासून ही बाग सजवली आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी बांबूच्या झोपडीत बसण्याची आणि आराम करण्याची जागा बनवली आहे. तसेच झाडांना पाणी घालणे आणि बागेची देखभाल करण्यासाठी सर्व नागरिकांची मदत घेणार आहोत. यामुळे वृद्ध नागरिकांना या बागेचा लाभ घेता आणि निसर्गासोबत वेळ ही घालवता येईल.

मैथिली मनकवाड, मोहल्ला कमिटी अध्यक्ष -

'गेल्या वर्षी पालिकेने सर्व वॉर्ड ऑफिसमध्ये टेरेस गार्डन उभारण्याचा उपक्रम राबवायला सुरुवात केली, परंतु वानवडी-राम टेकडी वॉर्ड ऑफिस ज्या इमारतीत आहे,ती इमारत महापालिकेच्या मालकीची नसल्यामुळे आम्ही तेथे तो प्रकल्प करू शकलो नाही. या प्रकल्पासाठी शोधाशोध करून आमच्या मोहल्ला कमिटीच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन यावर काम सुरू केले, यात रोटरी क्लब सारख्या स्वयंसेवी संस्थांनी आर्थिक मदत केली व इतर अनेक लोक मदतीला आहे, अखेर हा प्रकल्प पूर्णत्वास आला.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com