इकॉनॉमिक सर्जिकल स्ट्राइक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

पुणे - "इकॉनॉमिक सर्जिकल स्ट्राइक', "एण्ड ऑफ ब्लॅक मनी' अशा शब्दांत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्याचे स्वागत
सर्वत्र होत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात मंगळवारी मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करत असल्याचे सांगितले. ही बातमी "सोशल मीडिया'वर प्रचंड वेगाने पसरली. "फेसबुक', "ट्विटर', "व्हॉट्‌सऍप' यावर जोरदार चर्चा सुरू झाली. त्यात मोदी यांनी अचानक घेतलेल्या निर्णयाने अनेकांची झोप उडविली असल्याच्या प्रतिक्रियेने चर्चेला सुरवात झाली. भ्रष्टाचार करणाऱ्यांना मोदी यांनी सर्वांत मोठा धक्का दिला आहे.

हा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल अनेकांनी मोदींना "हॅट्‌स ऑफ' केले तर, काहींनी आगामी निवडणुकांवर या निर्णयाचा निश्‍चित परिणाम होईल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. नजीकच्या काळात काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत, तर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचा वापर केला जातो. या नोटाच आता चलनातून बाजूला केल्याने राजकीय नेत्यांना हा मोठा फटका असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
काही तरुणांनी या निर्णयाचे वर्णन "इकॉनॉमिक सर्जिकल स्ट्राइक' असे केले. त्याला शेकड्याने "लाइक्‍स' आणि "थम्स' मिळाले आहेत. आता काळ्या पैशाविरुद्ध युद्ध सुरू झाले, अशा आशयाच्या "कॉमेंट्‌स' झळकल्याचे दिसत होते.

हा एक ऐतिहासिक निर्णय असून, निर्णय जाहीर करण्यासाठी मोदी यांनी मोठे धाडस केले आहे. काळ्या पैशाच्या लढाईविरोधात प्रत्येक प्रामाणिक नागरिक सहभागी होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे.
अमेरिकेत होत असलेल्या मतमोजणीचा संदर्भ देत काहींनी "अमेरिका काउंटिंग व्होट्‌स, इंडियन काउंटिंग व्होट्‌स' अशी "पोस्ट'ही व्हॉट्‌सऍपच्या "ग्रुप'वरून फिरत होती.

Web Title: Economic surgical strikes