शिक्षण व उद्योगाच्या नवीन वाटा शोधा - तुषार वाजे

पुसाणे - कूळ स्नेहसंमेलनात उपस्थितांना मार्गदर्शन करताना शहापूर न्यायालयाचे न्यायाधीश तुषार वाजे.
पुसाणे - कूळ स्नेहसंमेलनात उपस्थितांना मार्गदर्शन करताना शहापूर न्यायालयाचे न्यायाधीश तुषार वाजे.

बेबडओहोळ - ‘समाजातील हुंडा प्रथा, अंधश्रद्धा यांसारख्या अनिष्ट प्रथा कालबाह्य झाल्या असून, यापुढे शिक्षणाच्या व उद्योगांच्या विविध क्षेत्रांत सामील होऊन तरुणांनी यश प्राप्त करावे,’’ असे प्रतिपादन शहापूर (जि. ठाणे) येथील न्यायाधीश तुषार वाजे यांनी पुसाणे येथे झालेल्या सोळाव्या कूळ स्नेहसंमेलनात केले.

ग्रामस्थांच्या वतीने स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी कैलास वाजे यांनी पुसाणे येथून वाजे कुळाचा इतर ठिकाणी झालेल्या स्थलांतराचा इतिहास सांगितला. सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे म्हणाले, ‘‘सर्व वाजे कुळाचे मूळ जन्मस्थान पुसाणे गाव असून, या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून नवीन पिढीला आपला इतिहास समजून घेण्याचे व विचारांचे आदानप्रदान करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.’’ या वेळी नाशिक येथील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे सहकारी बॅंकेचे अध्यक्ष नारायण वाजे, कोपरगावचे उपनगराध्यक्ष विजयराव वाजे, सिन्नरचे नगरसेवक हेमंत वाजे, नाशिक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील वाजे, बाळासाहेब वाजे, डॉ. अमोल वाजे, सुमन वाजे, धर्मराज वाजे आदींसह गुजरात, नाशिक, खेडभैरव, डुबेरे, विंचूर, कोपरगाव, नगर, हवेली, जव्हार, मोखाडा, पांढुर्ली आदी ठिकाणांहून वाजे कुळातील नागरिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com