
Closure of Sarathi Scholarship impacts 70,000 Maratha students; education at risk.
पुणे : मराठा समाजातील अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे आणि त्यांचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने ‘छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण, संशोधन व मानव विकास संस्थे’तर्फे (सारथी) २०२२ मध्ये ‘छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना’ सुरू करण्यात आली. मात्र, आता ही योजना बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होणार असून, त्यामध्ये पुण्यातील सुमारे सात हजार ५०० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.