

Education Department Tightens Oversight; Officers to Inspect Schools Across Maharashtra
sakal
पुणे : शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारे मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत दुपारचे भोजन यांसह ‘आनंददायी शनिवार’सारख्या उपक्रमांबरोबर विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होते की नाही, हे तपासण्यासाठी आता शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागणार आहे.