दिशा कायदा लागू झाल्यानंतर महाराष्ट्रात महिला सुरक्षित

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 February 2021

दिशा कायद्याबाबत बोलताना ते म्हणाले, ''महाराष्ट्रात महिलांवर कोणतेही अत्याचार होणार नाहीत. यासंबंधीची योग्य ती काळजी महाविकास आघाडीचे सरकार घेत आहे.

पुणे : ''पुढील वर्षांपासून राज्यातील सर्व महाविद्यालयात शिवजयंती हा दिवस 'स्वराज्यदिन' म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पुण्यात बोलताना केली.उ दय सामंत यांनी आज लाल महाल येथे भेट देऊन माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. त्यानंतर बोलताना त्यांनी ही घोषणा केली. ''पुढील वर्षांपासून माझ्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व महाविद्यालयात शिवजयंती हा दिवस 'स्वराज्यदिन' म्हणून साजरा केला जाईल. येत्या आठ दिवसात याचे परिपत्रकही काढणार'' असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दिशा कायद्याबाबत बोलताना ते म्हणाले, ''महाराष्ट्रात महिलांवर कोणतेही अत्याचार होणार नाहीत. यासंबंधीची योग्य ती काळजी महाविकास आघाडीचे सरकार घेत आहे. यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः अभ्यास करून दिशा कायदा महाराष्ट्रात आणला आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर या महाराष्ट्रात महिलांचे संरक्षण चांगल्या प्रकारे  होईल'' असा दावाही त्यांनी यावेळी केला.

'भारतमातेच्या महान सुपुत्राला नमन'; PM मोदींनी शिवजयंतीनिमित्त शेअर केला VIDEO 

रायगड लायटिंग बाबत  छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेविषयी बोलण्यास नकार...
राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी शिवजयंतीनिमित्त रायगडावर पुरातत्व खात्यातर्फे करण्यात आलेल्या विद्युत रोशनाईविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्याविषयी विचारले असता उदय सामंत म्हणाले आज शिवजयंतीचा दिवस आहे, छत्रपती शिवरायांना वंदन करण्याचा दिवस आहे. त्यामुळे या विषयावर बोलणे उचित ठरणार नाही.
 

'राज्यपालांचा मी लाडका मंत्री, पण वाद सोडवू शकत नाही'

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: education minister uday samant said Women are safe after implementing disha Law