‘सीईटी’च्या अर्जात सुधारणेची मिळणार संधी

एमएचटी सीईटीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना ३० जून पर्यंत स्वत:च्या लॉगिनमधून अर्जामध्ये सुधारणा करता येणार
Education News Opportunity to improve your CET application pune
Education News Opportunity to improve your CET application pune esakal

पुणे : तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण आणि फाइन आर्ट यामधील पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या जवळपास १६ सीईटी परीक्षांसाठी ११ लाख ६३ हजार २७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता एमएचटी सीईटी परीक्षेसाठी अन्य आठ अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जामध्ये सुधारणा करण्याची एक संधी विशेष बाब म्हणून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दिली आहे. त्यानुसार एमएचटी सीईटीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना ३० जून पर्यंत स्वत:च्या लॉगिनमधून अर्जामध्ये सुधारणा करता येणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.

सीईटी सेलमार्फत आता केवळ बी.एड (जनरल आणि स्पेशल) आणि एम.पी.एड सीईटीसाठी अर्ज नोंदणी अद्यापही सुरू आहे. उर्वरित परीक्षांसाठीची अर्ज नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या एमएचटी सीईटीसाठी आतापर्यंत सहा लाख ८९ हजार ४९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील सहा लाख सहा हजार १४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी परीक्षा शुल्क भरून पूर्ण केली आहे. दरम्यान काही विद्यार्थ्यांकडून अर्ज भरताना अनवधानाने विविध प्रकारच्या चुका झालेल्या असून त्या दुरुस्त करण्यासाठी सोय उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती सीईटी कार्यालयाकडे दूरध्वनी, ई-मेलद्वारे व प्रत्यक्ष कार्यालयात भेटून केली होती. त्याअनुषंगाने सीईटी सेलमार्फत विद्यार्थ्यांना अर्जात सुधारणा करण्याची संधी दिल्याचे परीक्षा कक्षाचे आयुक्त रविंद्र जगताप यांनी जाहीर सूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.

अर्जात ही सुधारणा करणे शक्य

विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही, ग्रुप बदल (म्हणजे पीसीएम व पीसीबी बदल), ग्रुप समावेश करता येणार आहे.

अर्जात सुधारणा करण्यासाठी अशी आहे मुदत

सीईटी परीक्षा : कालावधी

  • एमएचटी सीईटी : ३० जूनपर्यंत

  • एलएलबी (५ वर्ष), बीपीएड, एमएड, एलएलबी (३ वर्ष), बीए-बी.एड, बी.एस्सी-बी.एड - २७ ते २९ जून

  • बी.एड. ईएलसीटी, एमपीएड - ८ ते ११ जुलै

विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेसाठी झालेली नोंदणी

  • सीईटी परीक्षेचे नाव : नोंदणी केलेले विद्यार्थी : शुल्क भरून अर्ज निश्चित केलेले

  • एमएचटी-सीईटी (पीसीबी-पीसीएम) : ६,८९,४९६ : ३,२४,७६७(पीसीबी)/ २,८१,३७५ (पीसीएम)

  • एमबीए/एमएमएस-सीईटी : १,६०,७८१ : १,३७,६३७

  • एमसीए-सीईटी : ४४,५३१ : ३८,१६४

  • बी.एचएमसीटी : १,२६९ : ९६७

  • बी. प्लॅनिंग : ५४ : ३२

  • एम. एचएमसीटी : १३० :४१

  • एम. आर्च : १,०५३ : ८३९

  • फाइन आर्टस्‌ : ६,०२५ : ३,९९४

  • बीए/बीएस्सी बी.एड : ६,९२१ : २,३११

  • एलएलबी (५ वर्ष) : ३६,९०२ : २९,००७

  • एलएलबी (३ वर्ष) : ९९,९५८ : ७८,४७६

  • बी.पी.एड : ९,०९९ : ६,९२१

  • बी.एड/एम.एड : १२,०४८ : २,११५

  • एम.एड : ४,७०८ : ३,२६४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com