आदिवासी मुलींना मिळणार मोफत एअर होस्टेस प्रशिक्षण: महेंद्र वारभुवन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

education news Tribal girls get free air hostess training Mahendra Warbhuvan manchar pune

आदिवासी मुलींना मिळणार मोफत एअर होस्टेस प्रशिक्षण: महेंद्र वारभुवन

मंचर : “कोळवाडी-लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे डोंगर दरीत राहणाऱ्या आदिवासी महिलांनी टेलरिंग प्रशिक्षणातून जुन्या साड्या व कपड्यांपासून तयार केलेले आकर्षक रंगीबेरंगी विविध ड्रेस पाहून ठाणे आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त महेंद्र वारभूवन भारावून गेले. ते म्हणाले आदिवासी कुटुंबातील मुलींना उपजत कलाकृती आत्मसात आहेत. त्यांची जिद्द , धाडस व अभ्यासू वृत्ती कौतुकास्पद आहे.त्यांना अन्न प्रक्रिया, संगणक, ब्युटी पार्लर प्रमाणेच एअर होस्टेसचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल.”

या निर्णयाचे उपस्थित महिलांनी टाळ्यांचा कडकडाट करून स्वागत केले. कोळवाडी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव व ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था मंचर (ता.आंबेगाव) यांच्या वतीने आयोजित केलेल्या दीड महिना कालावधी मोफत टेलरिंग प्रशिक्षण सांगता समारंभ व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप वारभूवन व घोडेगाव एकात्मिक आदिवासी प्रकल्प स्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष सुभाषराव मोरमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाणे आदिवासी विभागाचे सहाय्यक प्रकल्प आयुक्त प्रदीप देसाई, आढावा समितीचे सदस्य विजयराव आढारी, घोडेगाव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी कैलास खेडकर, सुहास शिंदे, वास्तू विशारद यशला वळसे-पाटील उपसरपंच राजू शेवाळे ग्रामसेवक आर. आर. मुसम ,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी खंडू साबळे, मुख्याध्यापिका पद्मजा लोहट उपस्थित होते.

मोरमारे म्हणाले “एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव यांच्यावतीने आदिवासी मुलामुलींसाठी सुरु केलेले पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र अपुऱ्या अनुदाना अभावी बंद आहे. हे केंद्र त्वरित सुरु होण्यासाठी आदिवासी विभागाने पुढाकार घ्यावा. याकामी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे सहकार्य मिळेल.”

प्रशिक्षनार्थीं पूजा साबळे व सारिका उभे यांची मनोगते झाली. प्रशिक्षक अपर्णा गावडे, मालती शेंडे व मंदाकिनी उभे यांचा सत्कार करण्यात आला.ज्ञानशक्ती संस्थेच्या मुख्य कार्यकारी संचालिका गार्गी काळे पाटील यांनी प्रास्ताविक केले.संस्थेच्या उपाध्यक्षा रंजना शेटे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन अनिता चौधरी व अरुण गभाले यांनी आभार मानले.

“नागरिकांचे राहणीमान व पेहराव बदलत आहेत. त्यानुसार ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेने महिलांना टेलरिंगचे दिलेले दर्जेदार प्रशिक्षण कौतुकास्पद आहे. महिलांना घरबसल्या हक्काचा रोजगार मिळणार आहे.प्रशिक्षणार्थी महिलांना प्रत्येकी एक शिवण यंत्र मोफत दिले जाईल.”

- महेंद्र वारभूवन, अप्पर आयुक्त आदिवासी विभाग (ठाणे)

Web Title: Education News Tribal Girls Get Free Air Hostess Training Mahendra Warbhuvan Manchar Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top