शिक्षणाचे ओझे आणि ‘शर्यतीचा घोडा’

Education-Issue
Education-Issue

पुणे - ‘बाळा, काकांना वन टू फिफ्टी आणि पोएम म्हणून दाखव!’ घरात पाहुणे आले, की आपल्या ३ ते ४ वर्षांच्या मुलाला पालक हमखास असे सांगतात. पाठीवरच्या दप्तराच्या ओझ्याचा प्रश्‍न निकाली निघाला नसतानाच नर्सरीपासून मुलांना शिक्षणाचेच ‘ओझे’ वाटायला सुरवात होते.

आंतरराष्ट्रीय मापदंडामुळे पहिल्या टप्प्यापासूनच मुले ‘शर्यतीचा घोडा’ बनत आहेत.

इंग्रजी माध्यमाच्या उच्चभ्रू नर्सरीपासूनच अनेक शाळा किमान ५० हजार ते १ लाखापर्यंतचे शुल्क आकारतात. यामध्ये अत्याधुनिक सोईसुविधा पुरविल्या जात असल्या, तरी मुलांना घडण्यामध्ये त्याचा कितपत फायदा होतो, याबाबत अनेक पालकांच्या मनात साशंकता आहे. नर्सरीपासूनच सीबीएसई, केंब्रिज, अशा वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचा भाग मुलांना शिकविला जातो. अनेक शाळांमध्ये उत्कृष्ट शिक्षकवर्ग, अत्याधुनिक वर्ग यांसारख्या सोईिसुविधा असतात. एका नर्सरीमध्ये किमान १५ ते २० मुलांसाठी एक शिक्षिका व एक मावशी, असा स्टाफ असतो.

शाळा, पालक बऱ्याचदा मुलांना शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय मापदंडात बसवू पाहतात. भौतिक गोष्टींत अडकल्यामुळे मातीत खेळणे, जोरजोरात उड्या मारणे, या गोष्टी हरवत चालल्या आहेत. आंतरराष्ट्रीय मापदंड असले, तरीही भारतात शिक्षण व्यवस्था पूर्ण बदललेली नाही. त्यामुळे कायम पुढे राहण्याच्या अट्टहासामुळे बालपणातला आनंद हरवत चालला आहे.
- रजनी स्वामी, मानसशास्त्रज्ञ

बऱ्याचदा वेगवेगळ्या अभ्यासक्रमांबाबत अनेकांमध्ये स्पष्टता नसते. त्यामुळे भरपूर फी, मोठा अभ्यासक्रम म्हणजे चांगले शिक्षण, असे समीकरण झाले आहे. परंतु, यामुळे मुलांना व्यक्त होण्यासाठीच्या संधी हिरावत चाललो आहोत.
- कांचन उंबरकर, पालक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com