पुण्यातील 'या' शैक्षणिक संस्थेची सीमाभिंत धोकादायक (व्हिडिओ)

राजेंद्रकृष्ण कापसे
बुधवार, 17 जुलै 2019

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे नऱ्हे शैक्षणिक संकुल आहे. संकुल संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत आहे. येथे व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी वसतिगृह इमारतीचे बांधकाम पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या मान्यतेने झालेले आहे. आता या इमारतीत शैक्षणिक उपक्रम सुरू आहे. संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी कॉलेज व वसतीगृह या इमारतीच्या सीमा भिंतीलगत भिंतीच्या दुसऱ्या बाजूला बांधकाम व्यवसायिकांनी खोदकाम केल्यामुळे संस्थेच्या सीमाभिंतीचा पाया उघडा पडला आहे. त्यामुळे संस्थेची सीमाभिंत पडून दोन्ही बाजूला धोका निर्माण झाला आहे.​

खडकवासला(पुणे) : इमारतींच्या सीमाभिंती पडून झालेल्या अपघातात भिंतीच्या दुसऱ्या बाजूला राहणाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहे. अशाच प्रमाणे नऱ्हे येथे शैक्षणिक संस्थेची सीमाभिंत धोकादायक झाली आहे. याबाबत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने विविध खात्यांना पत्रव्यवहार करून ही बाब लक्षात आणून दिली आहे.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे नऱ्हे शैक्षणिक संकुल आहे. संकुल संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत आहे. येथे व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी वसतिगृह इमारतीचे बांधकाम पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या मान्यतेने झालेले आहे. आता या इमारतीत शैक्षणिक उपक्रम सुरू आहे. संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी कॉलेज व वसतीगृह या इमारतीच्या सीमा भिंतीलगत भिंतीच्या दुसऱ्या बाजूला बांधकाम व्यवसायिकांनी खोदकाम केल्यामुळे संस्थेच्या सीमाभिंतीचा पाया उघडा पडला आहे. त्यामुळे संस्थेची सीमाभिंत पडून दोन्ही बाजूला धोका निर्माण झाला आहे.

याबाबत,  संस्थेने पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण, नऱ्हे ग्रामपंचायत, सिंहगड रोड पोलीस स्टेशन व  संबंधित बांधकाम व्यवसायिक यांना पत्र देऊन दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. याची माहिती दिली आहे. संस्थेच्या या महाविद्यालय वसतीगृह इमारती ठिकाणी पाचशे विद्यार्थीनी शिकत आहेत. संबंधित सीमा भिंत पडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब संस्थेतील विद्यार्थिनी यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The educational institution Wall is dangerous at Narahhe