पुण्यातील शैक्षणिक संस्थांच्या 'फर्ग्युसन विद्यापीठास' शुभेच्छा 

educational institutions of Pune gives the Best wishes to Fergusson University
educational institutions of Pune gives the Best wishes to Fergusson University

पुणे - केंद्र सरकारने पुण्यातील ऐतिहासिक फर्ग्युसन महाविद्यालयाला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. असा दर्जा मिळवणारी ही पुण्यातील पहिलीच संस्था आहे. या निमित्ताने शिक्षण संस्था संचालकांचा एकत्रित चहापानाचा कार्यक्रम शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार विजय काळे यांनी आयोजित केला होता.

या कार्यक्रमात सर्व संस्थांच्या वतीने स्पायसर ऍडव्हेनिस्ट विद्यापीठाचे (स्पायसर कॉलेज) कुलगुरू डॉ. संजीवन अरसूद यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालास शुभेच्छा दिल्या. यंदा प्रवेश घेणारा विद्यार्थी फर्ग्युसन विद्यापीठाची पदवी घेऊन बाहेर पडेल, असे डॉ. कुंटे यांनी यावेळी सांगितले.

या अनौपचारिक कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळीचे ऍड एस. के. जैन, पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीओईपी) संचालक डॉ. आहुजा, खडकी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, खडकीतील तमीळ माध्यमाच्या एसव्हीएस संस्थेचे फ्रान्सीस, भारती विद्या भवनचे संचालक नंदकुमार कार्कीडे, पुणे कॅन्टोन्मेंटच्या नगरसेविका डॉ. किरण मंत्री, नगरसेविका वृषाली चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे विद्यापीठाचे कामकाज याच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या कॅम्पसमधून सुरू झाले असल्याने फर्ग्युसनला मिळालेला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा उचित असल्याची भावना सर्वांनी व्यक्त करून विद्यापीठाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com