शिक्षण, करिअरबाबतचे मार्गदर्शन एकाच ठिकाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

पुणे - भविष्यातल्या शिक्षणाच्या संधी, बदललेले अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, करिअरच्या विविध संधी आणि बदलत्या तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थी आणि पालकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठाने १६ मे ते १६ जूनदरम्यान राज्यातल्या बारा शहरांमध्ये ‘एज्युस्पायर ॲडमिशन एक्‍स्पो’चे आयोजन केले आहे.

पुणे - भविष्यातल्या शिक्षणाच्या संधी, बदललेले अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, करिअरच्या विविध संधी आणि बदलत्या तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थी आणि पालकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठाने १६ मे ते १६ जूनदरम्यान राज्यातल्या बारा शहरांमध्ये ‘एज्युस्पायर ॲडमिशन एक्‍स्पो’चे आयोजन केले आहे.

‘यिन’ने महाविद्यालयीन तरुणांसाठी आयोजित केलेल्या ‘यिन समर यूथ समिट’च्या निमित्ताने हा एक्‍स्पो होणार आहे. मुंबई, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, नागपूर, नाशिक, अकोला, नगर, औरंगाबाद, नांदेड आणि जळगाव या बारा शहरांमध्ये १६ मे ते १६ जूनदरम्यान या परिषदा होणार आहेत. स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी एक्‍स्पोची मुख्य प्रायोजक आहे. पॉवर्ड बाय डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी, पिंपरी, या एक्‍स्पोसाठी पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, सृजन कॉलेज ऑफ डिझाईन, पुणे, सिमॅसिस इंटरनॅशनल इंटरडिसिप्लिनरी लर्निंग सेंटर (एसआयआयएलसी) आणि सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌स, पुणे सहप्रायोजक आहेत. राज्याच्या विविध भागांमधील अधिक नामांकित संस्थांचा सहभाग आणि त्याचबरोबर शिक्षण आणि करिअरसंबंधी मोफत मार्गदर्शन हे या एक्‍स्पोचे वैशिष्ट्य आहे. योग्य अभ्यासक्रमाची व संस्थांची निवड, या निवडीचे निकष, शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल, नवीन परीक्षा पद्धती, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा, ग्लोबल एज्युकेशन, ॲनिमेशन, माध्यमे तसेच अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीच्या स्थानिक, राज्यातील, देशाच्या अन्य भागांमधील व परदेशांतील नामांकित शिक्षणसंस्थांची माहिती या एक्‍स्पोमुळे एकाच ठिकाणी मिळणार आहे. विविध परीक्षांचे निकाल लागून करिअरच्या दृष्टीने अभ्यासक्रमाची निवड करण्याच्या या काळात विद्यार्थी आणि पालकांसाठी हा एक्‍स्पो महत्त्वाचा ठरणार आहे.

बदलत्या तंत्रज्ञानाचा मागोवा
या एक्‍स्पोच्या निमित्ताने उभारण्यात येणाऱ्या एक्‍स्पिरियन्स झोनमध्ये बदलत्या तंत्रज्ञानाचा मागोवा घेता येणार आहे. रोबो, नॅनो ड्रोन, व्हर्च्युअल रिॲलिटी, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आयआरव्हीआर आदी तंत्रांचा अनुभव घेता येणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क ः गणेश घोलप : ८४५१८७१६६० आणि बंदेनवाज जातगार : ७७०९६०५४६७

Web Title: Eduspire Admissions Expo YIN