esakal | प्रभावी होमिओपॅथीला सर्वमान्यता मिळण्याची आवश्यकता - ॲड निकम
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभावी होमिओपॅथीला सर्वमान्यता मिळण्याची आवश्यकता - ॲड निकम

प्रभावी होमिओपॅथीला सर्वमान्यता मिळण्याची आवश्यकता - ॲड निकम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘ऍलोपॅथी-होमिओपॅथी हा वाद, त्यातील मतमतांतरे जुना विषय आहे. पण होमिओपॅथीने अनेक चमत्कार घडविल्याचे पहिले आहे. कोणत्याही ऑपरेशन किंवा इंजेक्शन शिवाय केवळ पांढऱ्या गोळ्या प्रभावी ठरतात. त्यामुळे होमिओपॅथीला सर्वमान्यता मिळण्याची आवश्यकता आहे.’’ असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी केले.

मिशन होमिओपॅथी व आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटल अँड हिलींग सेंटरच्या वतीने आयोजित डॉ. अमरसिंह निकम लिखित ‘अ होमिओपॅथस् गाइड टू कोविड-१९’ या पुस्तकाचा प्रकाशन व होमिओपॅथिक कोविड हिरो’ सन्मान सोहळ्यात ॲड निकम बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रसाद लाड, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह प्रवीण दबडगाव, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. अमरसिंह निकम, डॉ. जसवंत पाटील, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड आदी उपस्थित होते.

हेही वाचा: ठाकरे सरकार देणार चंद्रकांत पाटलांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे

ॲड. निकम म्हणाले, ‘‘कोणतेही सेवा देताना नीतिमूल्यांची जाणीव आणि सखोल अभ्यास हवा. या दोन्ही गोष्टींचा अवलंब करत होमिओपॅथीला सर्वमान्य होण्यासाठी डॉ. अमरसिंह निकम प्रयत्न करत आहेत.’’

डॉ. निकम म्हणाले, ‘‘होमिओपॅथीकडे अनेकजण शेवटचा पर्याय म्हणून पाहतात. पण होमिओपॅथी सर्व आजारांवर उपचार देणारी पद्धती आहे. कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही होमिओपॅथी औषधांबाबत सकारात्मकता दाखवली. त्यामुळे राज्यभरात ही औषधे मोफत देता आली. प्रतिबंधक औषध म्हणून त्याचा चांगला उपयोग झाला.’’

हेही वाचा: मोठी बातमी! 'कोव्हॅक्सिन'ला या आठवड्यात WHOची मिळणार मंजुरी

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिशन होमिओपॅथीचे डॉ. नीलेश जंगले व आशिष चौबे यांनी केले तर, आभार डॉ. सुचित्रा निकम यांनी मानले.

loading image
go to top