कर्तृत्ववान अधिकारी साधणार युवकांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 जानेवारी 2019

पुणे - युवकांनो, देशात आणि राज्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे प्रशासन आणि पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी आपल्या भेटीला येत आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील, तमिळनाडू सरकारमधील सचिव आनंद पाटील आणि तेलंगणातील पोलिस आयुक्त महेश भागवत यांच्याशी संवाद साधण्याची संधी यातून मिळणार आहे. 

राष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून शोध मराठी मनाचा या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला आहे. येत्या शनिवारी (ता. १२) स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होईल. जागतिक मराठी अकादमी, सृजन फाउंडेशन आणि स्टोरी टेल यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असून, ‘सकाळ’ या कार्यक्रमाचा माध्यम प्रायोजक आहे. या प्रसंगी मुकुल माधव फाउंडेशनच्या रितू छाब्रिया, सृजनचे रोहित पवार आणि स्टोरी टेलचे योगेश दशरथ हेही उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाबद्दल सचिन इटकर म्हणाले, ‘‘तरुणांना प्रेरणा आणि त्यांच्या आयुष्याला दिशा मिळावी, असा आमचा प्रयत्न आहे. हा उद्देश समोर ठेवून जगभरात कर्तृत्व गाजविणाऱ्या वीस प्रेरणादायी मराठी व्यक्तिमत्त्वांना वर्षभरात तरुणांसमोर आणून त्यांचा संवाद घडविला जाणार आहे, त्याची ही सुरवात आहे. अधिकाधिक तरुणांनी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा.’’

Web Title: Efficient Officer Discussion with Youth