ट्रेकिंगमुळं कोरोना पसरतो? महाराष्ट्रात स्थानिक ग्रामस्थांच्या शंका होणार दूर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

- गिर्यारोहणामुळे संसर्ग पसरण्याची संभ्रमाला दूर करण्यासाठी
- ग्रामस्थांची समस्या समजून अडचणी दूर करण्याचा प्रयत्न

पुणे : कोरोना या संसर्गाचा प्रादुर्भाव मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये मोठ्या वेगाने वाढत आहे. दरम्यान गिर्यारोहणाला या शहरांमधून येणारे गिर्यारोहकांमुळे आपल्यालाही कोरोना होईल अशी भीती स्थानिक ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्यावतीने गिर्यारोहनाशी संबंधित काही नियमावली तयार करण्यात आली असून राज्यातील सहा जिल्हे ज्या ठिकाणी सर्वाधिक भटकंती आणि गिर्यारोहण केले जात आहे तेथील ग्रामस्थांचे प्रबोधन केले जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा   किल्ल्यावर भटकंतीला अलेल्यांवर काही ग्रामस्थांचेही थेट उत्पन्न अवलंबून असते. अश्यात शहरांमधून भटकंती किंवा गिर्यारोहणाला येणाऱ्यांमुळे गावात कोरोनाचा शिरकाव होईल ही भीती सुद्धा त्यांच्या मनात आहे. परंतु गिर्यारोहणाला आलेला प्रत्येक व्यक्ती बाधित आहे असे नाही. त्यामुळे लोकांमधला हा गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, रायगड, नगर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये सह्याद्रीची रांग असून येथे गिर्यारोहण आणि भटकंती प्रामुख्याने केले जाते. त्यामुळे या भागातील लोकांचे प्रबोधन करणे गरजेचे असून पुढील आठवड्यापासून हे कार्य सुरू करणार आहोत. यासाठी ग्रामस्थ, गावातील सरपंच यांच्यासह बैठक घेतली जाणार असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी दिली.

कोरोनाला रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे आणखी एक पाऊल; नागरिकांच्या प्रवासावर येणार... 

असे करणार प्रबोधन
- गिर्यारोहणाचे प्रमुख केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रबोधनाची सुरवात
- गावातील लोकांच्या अडचणी समजून घेत उपाय काढणे व त्या प्रमाणे त्यांचे प्रबोधन करणे
- गिर्यारोहकांमुळे गावातील लोकांचा रोजगार अवलंबून असल्याने खबरदारीचे नियम कसे पाळावे याबाबत माहिती देणे

'पुणेरी पाटी'ने सुरु केलं ऑनलाइन युद्ध, विषय हैदराबादी बिर्याणीचा 
 
टास्क फोर्सचे कार्यकर्ते पालिकेला करणार मदत:

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तीस कोविड सेंटर्स मध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याने महापालिकेच्या मदतीला आता टास्क फोर्सचे कार्यकर्ते मदतीसाठी तयार आहेत. तसेच यासाठी टास्क फोर्स मधले सुमारे 100 स्वयंसेवक सहभाग घेणार आहेत. टास्क फोर्स मधले सर्व स्वयंसेवक हे विविध गिर्यारोहण संस्थेतील आहेत. तसेच काही भागातील कोविड सेंटर्स तेथील गिर्यारोहण संस्थेद्वारे दत्तक घेण्यात येणार असून या सेंटर्सची संपूर्ण जबाबदारी स्वयंसेवक पार पडतील. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी सुद्धा या स्वयंसेवकांनी स्वीकारली आहे. 

अन्नपूर्णाचे स्वप्न लवकरच करू पूर्ण :

लॉकडाऊनमुळे गिरिप्रेमीच्या 'माउंट अन्नपूर्णा 1' या आठव्या अष्टहजारी मोहिमेला देखील रद्द करण्यात आले होते. परंतु लॉकडाऊनमुळे आम्हाला या मोहिमेकरिता तयारी करण्यासाठी आणखीन वेळ मिळाला आहे. यासाठी सर्व गिर्यारोहक शारीरिक अभ्यासावर भर देत आहेत. तसेच अन्नपूर्णा या शिखराच्या चढाई दरम्यान शेरपांशिवाय अल्पाईन पद्धतीचा वापर करत गिर्यारोहक सर्व मार्ग खुले करतील असे स्वप्न आमचे स्वप्न आहेत. तसेच त्यावर आम्ही भर देत असल्याचे झिरपे यांनी नमूद केले. 
 

लॉकडाऊनमुळे गिरिप्रेमीच्या 'माउंट अन्नपूर्णा 1' या आठव्या अष्टहजारी मोहिमेला देखील रद्द करण्यात आले होते. परंतु लॉकडाऊनमुळे आम्हाला या मोहिमेकरिता तयारी करण्यासाठी आणखीन वेळ मिळाला आहे. यासाठी सर्व गिर्यारोहक शारीरिक अभ्यासावर भर देत आहेत. तसेच अन्नपूर्णा या शिखराच्या चढाई दरम्यान शेरपांशिवाय अल्पाईन पद्धतीचा वापर करत गिर्यारोहक सर्व मार्ग खुले करतील असे स्वप्न आमचे स्वप्न आहेत. तसेच त्यावर आम्ही भर देत असल्याचे झिरपे यांनी नमूद केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Efforts of All Maharashtra Mountaineering Federation for the awakening of local villagers about corona