वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी बारामती नगरपालिकेचे प्रयत्न कमी

मिलिंद संगई, बारामती
शनिवार, 7 जुलै 2018

बारामती शहर :  शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी एकीकडे शहर पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी गेले काही दिवस पुढाकार घेतला आहे, मात्र दुसरीकडे त्यांना नगरपालिका प्रशासनाकडून मात्र म्हणावे असे सहकार्य मिळत नाही, असे चित्र आहे. 

बारामती शहर :  शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी एकीकडे शहर पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी गेले काही दिवस पुढाकार घेतला आहे, मात्र दुसरीकडे त्यांना नगरपालिका प्रशासनाकडून मात्र म्हणावे असे सहकार्य मिळत नाही, असे चित्र आहे. 

तब्बल 55 लाख रुपयांहून अधिकचा खर्च करुन उभारलेले वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल्स) गेल्या काही वर्षांपासून धूळ खात पडून आहेत. यासाठी नगरपालिकेने खर्च केला खरा मात्र हे सिग्नल सुरु करण्याबाबत कधीच फारशी उत्सुकता दाखविली नाही. वेळोवेळी आलेल्या पोलिस निरिक्षकांनीही केवळ बघ्याचीच भूमिका घेतली होती.
विद्यमान पोलिस निरिक्षकांनी वाहतूक विभागात काम केलेले असल्याने त्यांना याचा अनुभव असल्याने त्यांनी वाहतूकीला शिस्त लावण्याचे मनावर घेतले आहे, मात्र वारंवार विनंती करुनही सिग्नल काही  सुरुच होत नाहीत. दिवसभर वाहतूक पोलिस होमगार्डच्या मदतीने महत्वाच्या चौकात वाहतूकीचे नियमन करताना दिसतात. सिग्नल सुरु झाले तर हे काम अधिक सोपे होणार असूनही कोणीही या बाबत फार उत्साही अजिबात दिसत नाहीत.

एकीकडे पोलिस काम करताना दिसत आहेत तर दुसरीकडे भर चौकात वाहतूकीला अडथळा करणा-या पथारी व्यावसायिक व हातगाड्यांसह अतिक्रमणांबाबत नगरपालिका फार काही करायला तयार नाही. अतिक्रमण हटविणे आमचे काम नसल्याने आम्ही या बाबत काही करणार नाही ही पोलिसांची भूमिका तर नगरपालिका काही करत नसल्याने नागरिकही हतबल आहेत. 

का सुरु होत नाहीत सिग्नल्स...
लाखोंचा खर्च करुनही सिग्नल बसविणारी कंपनी नगरपालिकेला दाद देत नाही की काही जणांना सिग्नलच सुरु होऊ द्यायचे नाहीत अशी शंका आता नागरिक घेऊ लागले आहेत. जिव्हाळ्याच्या प्रश्नातही पाठपुरावा नगरपालिकेकडून का होत नाही असा नागरिकांचा सवाल आहे. 

 

Web Title: The efforts of the Baramati Municipality to discipline traffic are low