Water Level : भूजल पातळी वाढविण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न

बांधकामे व इतर कारणांनी शहराची भूजल पातळी खालवली आहे. या पातळीत वाढ व्हावी यासाठी शहरातील बोअरवेल, विहरी तसेच डकवेलचे सर्वेक्षण प्रशासन करणार.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal

पुणे - बांधकामे व इतर कारणांनी शहराची भूजल पातळी खालवली आहे. या पातळीत वाढ व्हावी यासाठी शहरातील बोअरवेल, विहरी तसेच डकवेलचे सर्वेक्षण प्रशासन करणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच जलपुनर्भरणासाठी काम करणाऱ्या संस्थाची बैठक महापालिकेत घेण्यात आली.

अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, महापालिकेकडून शहरातील भूजल साठ्याचे जलपुर्नभरण करण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत. त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक बोलविण्यात आली होती. या संस्थानी शहराच्या भूजलच्या रचनेचे नकाशे तसेच झऱ्यांचे सर्वेक्षण केलेले आहे.

त्यानुसार, जलपुनर्भरण करण्यासाठी काय उपाय योजन करता येतील यासाठी बैठका घेण्यात येत आहेत. त्यात अनेक पर्याय पुढे आले असून या अनुषंगाने शहरासाठी स्वतंत्र आराखडा केला जाणार आहे. मात्र, त्यासाठी आधी शहरात भूगर्भातून किती पाण्याचा उपसा केला जातो हे समोर येणे आवश्‍यक असल्याने त्यासाठी आधी शहरातील बोअरवेल, विहरी तसेच डकवेलचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर या माहितीच्या आधारावर स्वतंत्र आराखडा तयार केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com