esakal | ऑक्सिजन बेड उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरु : चंद्रकांत पाटील

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत पाटील
ऑक्सिजन बेड उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरु : चंद्रकांत पाटील
sakal_logo
By
जितेंद्र मैड

कोथरुड : एसएनडीटीमध्ये विलगीकरण केंद्र सुरु केले असले तरी गंभीर प्रश्न आहे तो ऑक्सीजन बेडचा. त्यासाठी एखाद्या हॉस्पिटलची मदत घ्या. त्यांना पायाभूत सुविधा तुम्ही पुरवा अशा सुचना नगरसेवकांना देण्यात आल्या असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना दिली.

महानगरपालिकेच्या वतीने एसएनडीटी महाविद्यालयात २५० बेडचे विलगीकरण केंद्र सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर उपस्थित होते.

हेही वाचा: कोथरूड मधील प्रस्तावित लसीकरण केंद्र सुरू करा

पाटील म्हणाले की, लक्षणे दिसत नसलेल्यांसाठी केंद्र सुरु करत असतानाच ऑक्सिजन बेडची सुध्दा आम्ही व्यवस्था करत आहोत. ३५०० व्हँटीलेटर व आठहजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेसर सिंगापूर मधून मिळावेत यासाठी प्रयत्न सुरु आहे.

नाशिक, विरार येथील घटनेबद्दल विचारलेल्या प्रश्नाबद्दल बोलताना पाटील म्हणाले की, ''आरोग्य कर्मचारी जीवावर उदार होवून काम करत आहेत. एखादी चूक जीवावर बेतू शकते पण ती चुक अन्य ठिकाणी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कुठल्याही चौकशी शिवाय निष्कर्षावर जाणे चुकीचे होईल. मात्र या प्रत्येक दुर्घटनांची सखोल चौकशी व्हावी.''

हेही वाचा: पुन्हा ई-पास! दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन पासची यंत्रणा लागू

''पुणे मनपा लसीकरणाची सर्व जबाबदारी उचलायला तयार आहे. राज्याने लस विकत घ्यायची परवानगी दिली तर ६० दिवसात आपण सर्व लोकांना लस देवू. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राचे उत्तर आले आहे. रेमडेसीवीर औषधाच्या वाटपाबाबत संपूर्ण नियंत्रण अन्न व औषध प्रशासनाकडे आहे. महापालिका हे औषधही विकत घ्यायला तयार आहे.''

- गणेश बीडकर

''नाशिक, विरार सारख्या दुर्घटना पुण्यात घडू नयेत म्हणून महानगरपालिका हद्दीतील सर्व सरकारी व खाजगी रुग्णालयाकडून फायर ऑडीट, ऑक्सिजन व्यवस्थेच्या सुरक्षे बाबत प्रतिज्ञापत्र घ्यावे यासंदर्भात आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत.''

- महापौर मुरलीधर मोहोळ

हेही वाचा: कोथरूड मधील प्रस्तावित लसीकरण केंद्र सुरू करा

दादा म्हणाले-

  • अजित पवारांच्या कार्यक्षमतेबद्दल मी नेहमीच प्रशंसा केली आहे.

  • अजित पवारांनी पुण्याला पुरेसा वेळ द्यावा.

  • वाढता लोड लक्षात घेता एकतर त्यांनी पुण्यातून कारभार पहावा किंवा पुण्याचे पालकमंत्रीपद दुसऱ्याला द्यावे.

  • मुख्यमंत्र्यांनी शरद पवार, राज ठाकरे, नितीन गडकरी यांच्या अनुभवाचा उपयोग करुन घ्यावा.

  • पुनावाला यांनी लस पुरवठ्याबाबत महाराष्ट्राला प्राधान्य द्यावे असे मी आवाहन करतो.