esakal | कोथरूड मधील प्रस्तावित लसीकरण केंद्र सुरू करा

बोलून बातमी शोधा

co vaccine
कोथरूड मधील प्रस्तावित लसीकरण केंद्र सुरू करा
sakal_logo
By
समाधान काटे

मयुर कॉलनी : कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक येथे महापालिकेची शाळा छत्रपती संभाजी विद्यालय असून या ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी केली जात आहे. माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शहरप्रमुख गजानन थरकुडे,सहसंपर्कप्रमुख प्रशांत बधे,विधानसभाप्रमुख ॲड.योगेश मोकाटे यांनी आरोग्य प्रमुख डॉ.आशिष भारती यांच्याकडे केली ही मागणी होती.

सदर ठिकाणी आरोग्य विभागाकडून लसीकरण केंद्र सुरु करण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. त्याठिकाणी लसीकरण कक्ष, निरीक्षण कक्ष, नोंदणी कक्ष व नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था देखील पूर्ण करण्यात आली. परंतु अचानक या ठिकाणाचे लसीकरण केंद्र सुरु न करता नवीन ठिकाणी हे केंद्र हलवण्याचा घाट घातल्याने कोथरूड शिवसेना विधानसभा मतदारसंघ पदाधिकाऱ्यांच्या वतीने संबंधित आरोग्य विभागाला पत्र देऊन जाहीर निषेध करण्यात आला. तसेच या ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू केले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: पुन्हा ई-पास! दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन पासची यंत्रणा लागू

''सध्या लसीची कमतरता आहे.लसीचा पुरवठा सुरळीत झाला की,चार ते पाच दिवसात छत्रपती संभाजी विद्यालयात सुरू करणार आहोत".

- सचिन तामखेडे क्षेत्रीय अधिकारी कोथरूड क्षेत्रीय कार्यालय.

"संभाजी विद्यालय येथील केंद्रास १० दिवसांपर्वीच आयुक्तांची मान्यता मिळाली आहे.परंतु घाणेरडे राजकारण करुन काहींनी जाणुन बुजून हे केंद्र बंद ठेऊन इतरत्र केंद्र सुरु करण्याचा घाट घातला आहे.इतरत्र केंद्र सुरु करण्यास आमचा विरोध नाही पण शिवाजी महाराज चौकातील केंद्र सुद्धा त्वरीत सुरु झालेच पाहिजे"

- अॕड.योगेश मोकाटे शिवसेना कोथरूड विधानसभा प्रमुख

हेही वाचा: बाणेरमध्ये साकारतेय दुसरे कोविड केअर हॉस्पिटल

कोथरूड परिसरात सध्या सुरू असलेले लसीकरण केंद्र

  • सुतार हॉस्पिटल आझाद नगर

  • सुंदराबाई राऊत दवाखाना केळेवाडी

  • वीर सावरकर हॉल उजवी भुसारी कॉलनी

  • ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र बावधन

  • प्रस्तावित लसीकरण केंद्र

  • छत्रपती संभाजी विद्यालय कोथरूड गावठाण

  • यशवंतराव चव्हाण पुणे मनपा शाळा जय भवानी नगर गांधीभवन प्रभाग क्रमांक १२