‘शालेय आहारामधून अंड्यांना बंदी घाला’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

पुणे - ‘‘अंडे हे आरोग्याच्या दृष्टीने घातक असून, त्याच्या सेवनाने विविध आजार उद्‌भवतात. विविध संशोधनांमधूनही ही गोष्ट समोर आली आहे. त्यामुळेच शालेय मुलांच्या आहारातून जंक फूडप्रमाणेच अंड्यांनाही बंदी घालावी,’’ अशी मागणी सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी केली.  

महापालिकेच्या शाळांमधील मुलांना माध्यान्ह भोजनात उकडलेली अंडी देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. मात्र, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरांवर झालेल्या संशोधनात अंडे हे घातक असल्याचे सिद्ध झाले आहेत. गंगवाल म्हणाले, ‘‘अंड्यामध्ये प्रोटिनची मात्रा अतिशय कमी असते. त्या तुलनेत २०० मिलिग्रॅमपेक्षा अधिक कोलेस्टेरॉल असते. त्याच्या सेवनाने ॲलर्जी, टायफॉइड यासोबतच हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.’’ अनेक व्यावसायिक अंड्याला शाकाहारी पदार्थ म्हणून विकतात. इतकेच नव्हे, तर कोंबड्यांनी जास्त अंडी द्यावी, यासाठी पोल्ट्री फार्ममध्ये विविध प्रतिजैविक वापरून कृत्रिमरीत्या अंड्यांचे उत्पादन केले जाते. हा त्या प्राण्यांवर होणारा अन्याय आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: egg ban on school food