

Heatwave Cuts Egg Production, Maharashtra Sees Sharp Rise in Egg Prices
esakal
-सुदाम बिडकर
पारगाव: यावर्षीच्या उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात झालेल्या मरतूकीचा फटका पोल्ट्री उद्योगाला बसल्याने राज्यातील अंडी उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. बाजारातील अंड्यांचा पुरवठा कमी झाला असून, त्याचा थेट परिणाम दरवाढीवर झाला आहे. सध्या घाऊक बाजारात अंड्यांचा दर प्रति शेकडा ७७० रुपयांवर पोहोचला असून, किरकोळ बाजारात प्रति अंडे १० रुपये दराने विक्री होत आहे. अंड्याच्या दरातील आतापर्यंतचा हा उच्चांक मानला जात आहे.