दस्त नोंदणीचा मार्ग मोकळा; पण या आहेत अटी... 

Registrar_Office
Registrar_Office
Updated on

लोणी काळभोर (पुणे) : कटेंन्मेंट (प्रतिबंधित क्षेत्र) झोन वगळता पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व हवेली तालुक्‍यास असणाऱ्या सत्ताविसपैकी पंधरा दस्त नोंदणीची दुय्यम निबंधक कार्यालये बुधवारपासून (ता. 20) नियमितपणे सुरू करण्यात येणार आहेत. 

दस्त नोंदणीची दुय्यम निबंधक कार्यालये सुरू करताना पुरेशी खबरदारी घेऊनच कार्यालय सुरू होणार आहे. त्यामुळे पुणे शहर, पिंपरी चिंचवड व हवेली तालुक्‍याच्या काही भागातील नागरिकांना सदनिका, दुकाने, जमीन खरेदी- विक्रीचे व्यवहार बुधवारपासून सुरू करता येणार असल्याची माहिती जिल्हा सहनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी गोपीनाथ कोळेकर यांनी दिली आहे. 

दरम्यान, दस्त नोंदणीची पंधरा दुय्यम निबंधक कार्यालये सुरू करण्यात येणार असली, तरी कटेंन्मेंट (प्रतिबंधित क्षेत्र) झोनचा पत्ता असलेल्या नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत दुय्यम निबंधक कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. खरेदी अथवा विक्री करणाऱ्यांपैकी एकही जण कटेंन्मेंट (प्रतिबंधित क्षेत्र) झोनमधील नागरिक असल्यास दस्त नोंदणी होणार नसल्याचेही कोळेकर यांनी स्पष्ट केले आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना कोळेकर म्हणाले, ""दुय्यम निबंधक कार्यालये सुरू करताना कामकाजादरम्यान दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी, दस्त नोंदणीसाठी कार्यालयात येणारे नागरिक व वकील यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी पूर्णपणे खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी शासनाने आखून दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक दस्त नोंदणीसाठी ई टोकनच्या माध्यमातून आगाऊ वेळ दिली जाणार आहे. इतरांना कार्यालयात प्रवेशही दिला जाणार नाही. तसेच, कार्यालयाच्या निर्धारित वेळेत ठराविक संख्येने दस्त करण्याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 


ही कार्यालये सुरु होणार                               हवेली दुय्यम निबंधक कार्यालय क्रमाक ३ (मगरपट्टा, हडपसर), ४ (चांदनी चौक, कोथरुड), ५ (चिंचवड), ७ (चंदननगर), १०, ११ व २३ (फोटोझिंको प्रेस, पुणे स्टेशन), १३ (कर्वेनगर), १५ (पाषान), १६ (सिंहगड रोड), १८ व २६ (पिंपरी), १९ (औंध), २० (आंबेगाव, दत्तनंगर), २१ व २२ (मेंहदळे गॅरेज रोड), २४ (निगडी प्राधीकरण).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com