दापोडी सांगवीत ईद उत्साहात साजरी

रमेश मोरे
रविवार, 17 जून 2018

जुनी सांगवी : दापोडी जुनी सांगवी परिसरात ईद उत्साहात साजरी करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दापोडी शाखेच्या वतीने सिद्धार्थनगर, दापोडी येथे मुस्लिम बांधवांना माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी पुष्पगुच्छ, शिरखुरमा व मिठाई  देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी धनपाल सोनकांबळे, नवनाथ डांगे, हेमंत आबा माने, मिलिंद भोसले आदी आरपीआय कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व शेखर काटे युवा मंच च्यावतीने ईद निमित्ताने दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी येथील मशिदीत जाऊन मुस्लिम बांधवांना. शेखर काटे,नगरसेविका स्वाती माई काटे,विश्वजित कांबळे, राजेंद्र काळभोर यांनी लहान मुलांना जिलेबी भरवुन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

रोहितराज युवा प्रतिष्ठाणच्या  वतीने दापोडी, फुगेवाडी,कासारवाडी येथील मुस्लिम अनाथ व विधवा महिलांना ईद साजरी करण्यासाठी कपडे व शिरखुरमाचे साहित्य नगरसेवक रोहित आप्पा काटे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी संतोष काटे,तानाजी काटे, रफिक शेख,बंटी मुजावर, अब्दुल शेख,अझर शेख,राकेश काटे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर शेख व आभार नजिद मुजावर यांनी केले.जुनी सांगवीत श्री जवाहर ढोरे,दत्तात्रय भोसले,मदन कोठुळे,दिपक माकर,संजय मराठे यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी तन्वीर अन्सारी,साहिल अन्सारी,सोहेल शेख,समीर शेख,विजयसिंह भोसले आदी उपस्थित होते.

Web Title: eid celebrated with joy in dapodi