esakal | पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून नागरिकांच्या सेवेसाठी आठ रुग्णवाहिका 
sakal

बोलून बातमी शोधा

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून नागरिकांच्या सेवेसाठी आठ रुग्णवाहिका 

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज आठ रुग्णवाहिका सामाजिक उद्देशाने प्रदान केल्या गेल्या. या पैकी पुणे, बारामती व कर्जत साठी दिलेल्या रुग्णवाहिका कार्डिअँक स्वरुपाच्या असून उर्वरित पाच रुग्णवाहिका साध्या आहेत. 

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून नागरिकांच्या सेवेसाठी आठ रुग्णवाहिका 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज आठ रुग्णवाहिका सामाजिक उद्देशाने प्रदान केल्या गेल्या. या पैकी पुणे, बारामती व कर्जत साठी दिलेल्या रुग्णवाहिका कार्डिअँक स्वरुपाच्या असून उर्वरित पाच रुग्णवाहिका साध्या आहेत. 

Pune Rain : अनेकांसाठी ठरली रात्र वैऱ्याची; पाणी घरांत घुसल्याने नागरिकांना भरली धडकी

उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी या  रुग्णवाहिका आज पुण्यात एका कार्यक्रमात प्रदान केल्या. कोविडच्या काळात अनेकांना पुण्याला हलविताना रुग्णवाहिकांची नितांत गरज भासते. त्यातही कार्डिअँक रुग्णवाहिका वापरताना त्याला भरमसाठ भाडे आकारले जाते, जे भरणे सामान्यांना शक्य होत नाही. ही बाब विचारात घेत तीन कार्डिअँक रुग्णवाहिका व इतर पाच साध्या रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या आहेत. 
 
भोर वेल्हा भागासाठी शिवाजीराव शिवतारे प्रतिष्ठानला, अहमदनगरसाठी नीलेश लंके प्रतिष्ठान, दौंडसाठी दौंड शुगर या कारखान्यास, शिरुर भागासाठी रावलक्ष्मी फाऊंडेशनला, कर्जत जामखेड विभागासाठी कर्जत जामखेड इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट फाऊंडेशनला, इंदापूरच्या लोकांसाठी भगवानराव भरणे प्रतिष्ठान, बारामतीतील उपजिल्हा रुग्णालयास, तर पुणे शहरासाठी धनकवडी येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळास या रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या आहेत. 

सिगारेट ओढण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी; तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

रुग्णांना वाजवी दरात रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, त्यांच्यावरचा आर्थिक बोजा कमी व्हावा या उद्देशाने ना नफा ना तोटा या तत्त्वावर या रुग्णवाहिका रुग्णांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. बारामतीची रुग्णवाहिका ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी पुण्यात स्विकारली. त्यांच्या समवेत नगरसेवक सुधीर पानसरे, अभिजीत जाधव उपस्थित होते. 

या रुग्णवाहिकांमुळे पुणे, बारामती, कर्जत, भोर वेल्हा, शिरुर, इंदापूर, अहमदनगर, दौंड या भागातील रुग्णांना दिलासा प्राप्त होणार आहे. सर्व सोयींनी सुसज्ज अशा या रुग्णवाहिका आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)