पिंपरीतील टाटा मोटर्समध्ये  आठ दिवस ‘ब्लॉक क्‍लोजर’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

पिंपरी - टाटा मोटर्समध्ये शुक्रवारी (ता. ३०) आणि शनिवारी (ता. ३१) कंपनीमध्ये ब्लॉक क्‍लोजर (काम बंद) घेण्यात येणार आहे. कंपनीच्या सर्व प्रकल्पांमध्ये हे क्‍लोजर राहणार असून बुधवारी (ता. २८) आणि गुरुवारी (ता. २९) कंपनीतील ठराविक भागांमध्ये हे क्‍लोजर असेल. तसेच तीन ते पाच सप्टेंबर दरम्यानदेखील कंपनीतील ठराविक भागांमध्ये क्‍लोजर असेल. मशिनरीमध्ये बदल करणे आदी कामासाठी हे क्‍लोजर घेण्यात आले आहे. चार महिन्यांपूर्वी आणि या महिन्याच्या सुरवातीला अशाच प्रकारचा क्‍लोजर घेण्यात आला होता. या काळात प्रकल्पामधील उत्पादन प्रक्रिया बंद असते. 

वाहन उद्योगात काही दिवसांपासून मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक कंपन्या महिन्यातील काही दिवस उत्पादन बंद ठेवत  आहेत. भारतीय बाजारपेठेत पुढील वर्षापासून बीएस ६ वाहने येणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight days block closure at Tata Motors in Pimpri

टॅग्स