कुंटुंबातील तिघांचा मृत्यू तरीही 'त्या' रणरागिणी डगमगल्या नाहीत...

corona
coronaSakal Media

वालचंदनगर : धाडस, इच्छा शक्ती असले तर कोरोनावरती सहज मात करता येवू शकते. वालचंदनगरमधील पिसाळ कुंटूबातील कमल सदाशिव पिसाळ (वय ८०) अलका सतिश पिसाळ (वय ३४) व अनिता सचिन पिसाळ (वय २४) महिलांनी हे दाखवून दिले असून कोरोनावरती यशस्वी मात केली. अलका पिसाळ यांनी कोरोनावरती मात केल्यानंतर कुंटूबाला आधार देत कुंटूबातील सदस्यांना वाचविण्यासाठी धावपळ केली. मात्र कुंटूबातील तिघांचा कोरोनाने घात केला असून अलका यांच्या सासू-सासरे व दीराचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

वालचंदनगर बाजारपेठमध्ये तानाजी सदाशिव पिसाळ यांचे न्यु किशोर लाॅन्ड्री नावाचे कपड्याचे दुकान आहे. कपडे इस्त्री करुन कुंटूबाची उपजिविका सुरु आहे. गेल्या महिन्यामध्ये (ता. २२) रोजी अलका सतिश पिसाळ (वय ३४) यांना कोरोनाचा संसर्ग झाली होती. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांना वालचंदनगरमधील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यांनी कुंटूबातील अनिता सचिन पिसाळ (वय २४) , मुलगा यश सतिश पिसाळ (वय १०) , राज सचिन पिसाळ (वय ५) यांची कोरोना चाचणी करुन वालचंदनगरमधील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु केले. सासू नंदा तानाजी पिसाळ (वय ६०) यांना त्रास होवू लागल्याने त्यांना इंदापूरमधील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांची ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने मृत्यू झाला. तानाजी पिसाळ (वय ६५) यांनी त्यांचा अंतविधी करुन वालचंदनगरमध्ये आल्यानंतर अलका पिसाळ यांनी सासऱ्यांची कोरोना चाचणी करुन त्यांना बारामतीमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारसाठी त्यांनी धावपळ केली. मात्र त्यांचाही मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.

corona
दिलासादायक! पुणे शहरात दहा दिवसांत चार हजार खाटा झाल्या रिकाम्या

कुंटूबातील कमल सदाशिव पिसाळ (वय ८०) , पती सतिश तानाजी पिसाळ (वय ४१) व दीर सचिन तानाजी पिसाळ (वय ३४) यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सासू-सासऱ्याच्या मृत्यूनंतर अलका पिसाळ यांनी धीर सोडला नव्हता. कुंटूबातील सदस्यांकडे लक्ष केंद्रीत केले. दीर सचिन पिसाळ यांना सुरवातीला जंक्शनमधील कोविड सेंटर व नंतर सोलापूरमधील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. तर पती सतिश पिसाळ यांना बारामतीमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. आजींना सौम्य लक्षणे असल्यामुळे घरीच विलगीकरण करुन उपचार केले. सचिन पिसाळ यांच्यावरती उपचार सुरु असताना गेल्या बारा दिवसापूर्वी सोलापूरमध्ये निधन झाले. सतिश पिसाळ यांनी कोरोनावरती मात केली असून नुकताच उपचार घेवून घरी आले आहेत. एकाच कुंटूबातील तिघा जणांच्या मृत्यमुळे पिसाळ कुंटूबावरती अचानक संकट आले आहे. सतिश व अलका पिसाळ यांच्यावर संपूर्ण कुंटूबाची जबाबदारी आली आहे. एकाच कुंटूबातील तिघांच्या मृत्यमुळे वालचंदनगर परीसरावर शोककळा पसरली आहे.

corona
मोटोक्रॉस स्पर्धेची पुणे होणार राजधानी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com