मुळशीत कोरोनाचा धुमाकूळ, दिवसभरात सापडले आठ रुग्ण, एकूण आकडा अब तक छपन्न

धोंडिबा कुंभार
मंगळवार, 30 जून 2020

मुळशी तालुक्यातील अन्य गावांतील  कोरोना संशयित रुग्णांवरही तालुका आरोग्य विभाग लक्ष ठेवून असून, विविध उपाययोजना चालू आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी , असे आवाहन  केले आहे.

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने आज छपन्नचा आकडा गाठला. आज तालुक्यात तब्बल आठजण  कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

मुळशी तालुक्यात आज सूस येथील एक पुरुष , म्हाळुंगे येथे एक महिला, हिंजवडी येथे दोन पुरुष, जांबे येथे एक पुरुष, करमोळी येथे एक पुरुष , उरवडे येथे एक पुरुष, तर भूगाव येथे एक पुरुष, आदी आठ कोरोनाबाधित सापडले. त्यामुळे तालुक्यात आज कोरोना रुग्णांची संख्या छपन्न झाली. 

पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे

मुळशी तालुक्यात काल कासार आंबोली येथील  एका राजकीय पदाधिकाऱ्याला, तर  नांदे येथील ग्रामपंचायतीच्या एका माजी सरपंचाला कोरोना झाल्याने निष्पन्न झाले होते. तेथील ग्रामपंचायतीने मायक्रो कन्टेनमेंट झोन सील केला असून, विविध उपाययोजना सुरू आहेत. याशिवाय तालुक्यात विविध गावांतही  संशयित रुग्णांची संख्या वाढतच चालली असून, त्या सर्व संशयितांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. 

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

दरम्यान , आंदगाव येथील एका रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल आज निगेटिव्ह आला असून त्याच्या कुटुंबातील अन्य चारही जणांचे अहवालही  निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तेथील एका रुग्णास पंधरा दिवसांपूर्वी पुण्यामध्ये खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संबंधित रुग्णाचा ग्रामस्थांशी संपर्क असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण गावामध्ये औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

तालुक्यातील अन्य गावांतील  कोरोना संशयित रुग्णांवरही तालुका आरोग्य विभाग लक्ष ठेवून असून, विविध उपाययोजना चालू आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी , असे आवाहन तहसीलदार अभय चव्हाण व तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अजित कारंजकर यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight patients of Corona were found in one day in Mulshi taluka