esakal | दहशत माजविणाऱ्या ८ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नागरिकांवर करायचे हल्ले
sakal

बोलून बातमी शोधा

Crime_Arrest

पद्मावतील तळजाई वसाहत परिसरात घडलेल्या घटनेमध्ये मयूर आरडे (वय 20 ) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. आरडे यानेच सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दहशत माजविणाऱ्या ८ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नागरिकांवर करायचे हल्ले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुर्ववैमनस्यातून टोळक्‍याकडून नागरिकांवर तीक्ष्ण हत्यारांनी वार करुन, मारहाण करत, कोयत्याचा धाक दाखवत पद्मावतीमधील तळजाई वसाहत आणि आंबेगाव परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली जात असल्याच्या घटना घडत आहेत. याप्रकरणी सहकारनगर, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. 

रशियाच्या लशीची पुण्यात मानवी चाचणी

पद्मावतील तळजाई वसाहत परिसरात घडलेल्या घटनेमध्ये मयूर आरडे (वय 20 ) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. आरडे यानेच सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी सकाळी सहा वाजता टोळक्‍याने हातात हत्यारे घेऊन संबंधीत परिसरात दहशत निर्माण केली. त्यावेळी टोळक्‍याने मयूरला त्याच्या घराबाहेर फरफटत आणून त्याच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले.

रणजितसिंह डिसले यांना 'महाराष्ट्र भूषण' द्या; मुख्यमंत्र्यांकडे मागणी​

या घटनेमध्ये स्थानिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. टोळक्‍याच्या हल्ल्यात मयूर हा गंभीर जखमी झाला आहे. त्यावेळी आरोपींनी घराच्या पत्र्यावर दगडफेक केली. तसेच नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवित त्यांच्यात दहशत निर्माण केली. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

कात्रज येथील आंबेगाव बुद्रुक परिसरातील स्वामी सदन सोसायटीसमोर शनिवारी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास टोळक्‍याने दहशत निर्माण केली. गुन्हेगारांनी परिसरातील वाहनांवर दगडफेक करून वाहनांचे नुकसान केले. तसेच दुकानदारांना शस्त्राचा धाक दाखवून दुकाने बंद पाडण्यास भाग पाडले.

Tell Me Your Story : डिप्रेशन दूर करायचे 'राज'; पुण्यातील तरुणाचे कौतुकास्पद 'मिशन'

याप्रकरणी तुषार मधुकर डिंबळे (वय 23), निखील सखाराम आखाडे (वय 24), अविनाश रामदास महामुनी (वय 29), अजिंक्‍य रामदास काळे (वय 20), विशाल विष्णू कांबळे (वय 24), यश प्रशांतसिंग साहोता (वय 21), दीपक किसन तोरमकर (वय 22), अमोल ज्योतिबा कांबळे (वय 25, सर्व रा.आंबेगाव पठार) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तसेच संशयित आरोपींसमवेत असलेल्या तीन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पवार करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image