फायनान्स कंपनीलाच घातला 51 लाखांना गंडा; कसा? वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

फसवणूक झाल्याचा प्रकार कंपनीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पुणे : फायनान्स कंपनीला आठजणांनी बनावट कागदपत्रे सादर केली आणि त्याद्वारे फायनान्स कंपनीला 51 लाख 40 हजार रूपयांचे कर्ज घेत कंपनीची फसवणूक केली. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनो, जिओ टी.व्ही. उघडा अन् अभ्यासाला लागा!

मयुर मुकिंदा चौधरी, उषा मुंकिंदा चौधरी, कपील सरवदे, रूपाली कपील सरवदे यांच्यासह आणखी चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जितेंद्र कल्याणजी खंत (वय 65, रा.कांदीवली पूर्व, मुंबई) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

- सीमकार्ड अपडेट करून देतो म्हणाला अन् ११ लाखांना गंडा घातला!

हा प्रकार 26 डिसेंबर 2018 पासून आत्तापर्यंत घडला आहे. दाखल फिर्यादीनुसार, फिर्यादी यांच्या आनंद हौसिंग फायनान्स कंपनीत गृहकर्ज मिळविण्यासाठी संशयित आरोपींनी खोट्या नावाची कागदपत्रे बँक खात्याची कागदपत्रे, सेल डीड, बांधकाम कंपनीचे डिमांड लेटर, ना हरकत प्रमाणपत्र अशी बनावट कागदपत्रे बनवून ती खरी असल्याची भासवून कंपनीला सादर केली. त्यानंतर कंपनीकडून 51 लाख 40 हजारांचे कर्ज मिळविले.

दरम्यान, फसवणूक झाल्याचा प्रकार कंपनीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight persons submitted fake documents to the finance company and defrauded by taking a loan