esakal | दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनो, जिओ टी.व्ही. उघडा अन् अभ्यासाला लागा!
sakal

बोलून बातमी शोधा

Jio_TV

सध्या राज्यातील जवळपास कोट्यावधी नागरिकांकडे जिओ फोन, जिओ मोबाइल आहे, त्यात ते जिओ टीव्हीद्वारे या तासिकातून अभ्यास करू शकणार आहे.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनो, जिओ टी.व्ही. उघडा अन् अभ्यासाला लागा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : इयत्ता दहावीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यम आणि बारावीच्या विज्ञान शाखेसाठी 'जिओ टी.व्ही.' वरील ज्ञानगंगा या तीन शैक्षणिक वाहिन्यांचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी (ता.५) ऑनलाईनद्वारे केले. तर इतर नऊ स्वतंत्र शैक्षणिक वाहिन्या लवकरच येणार आहेत, असेही गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

- सीमकार्ड अपडेट करून देतो म्हणाला अन् ११ लाखांना गंडा घातला!

कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र ऑनलाइनद्वारे सुरु आहे. या पद्धतीने शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहचविण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून 'जिओ टीव्ही'वर इयत्ता 12 वी सायन्स, इयत्ता दहावी मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी आणि बारावी विज्ञान शाखेसाठी 'जिओ ज्ञानगंगा' या तीन वाहिन्या आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय 'जिओ सावन'वर महावाणी रेडीओ कार्यक्रमाचे उद्घाटनही आज गायकवाड यांनी व्हीडिओ कॉन्फरसिंगद्वारे केले.

- केरळ सरकारनं केली एक वर्षाची तयारी, वाचा नागरिकांसाठीचे नियम!

याबाबत गायकवाड यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकॉउंटद्वारे माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना घरपोच पाठ्यपुस्तके पोचविण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात असून हे काम अंतिम टप्यात असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्याकडून शैक्षणिक दिनदर्शिका देण्यात आली असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना स्वयंअभ्यास करताना मदत होणार आहे.

- विद्येच्या माहेरघरात घडला धक्कादायक प्रकार; पाचवीच्या अॅडमिशनसाठी मागितले अडीच लाख!

असे होईल प्रक्षेपण
- जिओ प्लॅटफॉर्मवरील तीन वाहिन्यांवर दररोज सहा तास तासिका प्रक्षेपित केल्या जातील
- इतर अठरा तास त्याचे पुनप्रक्षेपण होईल
- तासिकांचे वेळापत्रक लवकरच उपलब्ध होईल
- लवकरच इतर नऊ जिओ वाहिन्या सुरू करणार
- इयत्ता दहावी (उर्दू माध्यम), इयत्ता नववी (मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यम), इयत्ता आठवी, सातवी आणि सहा 
वी (इंग्रजी, मराठी, उर्दू माध्यम) आणि इयत्ता तिसरी-चौथी (इंग्रजी, उर्दू, मराठी) वाहिनी लवकरच सुरू होणार

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इयत्तानिहाय चोवीस तास वाहिनी
इयत्तानिहाय चोवीस तास वाहिनी सुरू राहणार आहे. सध्या राज्यातील जवळपास कोट्यावधी नागरिकांकडे जिओ फोन, जिओ मोबाइल आहे, त्यात ते जिओ टीव्हीद्वारे या तासिकातून अभ्यास करू शकणार आहे. याबरोबरच 'जिओ सावन'वर विद्यार्थ्यांना बोलकी पुस्तके उपलब्ध करुन दिली जाणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप