Corona Updates: पुणे जिल्ह्यात ८ महिन्यात ८ हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये 131, जिल्हा परिषद क्षेत्रात 138, नगरपालिका क्षेत्रात 31 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 15 नवे रुग्ण सापडले आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यात आतापर्यंतच्या सुमारे आठ महिन्यांच्या कालावधीत आठ हजार 16 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानुसार दर महिन्याला सरासरी 1 हजार रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, गुरुवारी (ता.5) दिवसभरात जिल्ह्यात 543 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांमध्ये शहरातील 228 रुग्णांचा समावेश आहे.

गुरुवारी 624 जण कोरोनामुक्त झाले असून अन्य 31 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासांत 6 हजार 526 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आज अखेरपर्यंतच्या जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 26 हजार 527 झाली आहे. यापैकी 3 लाख 7 हजार 298 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

दिवाळीनिमित्त गावी जाताय; पुण्यातून सुटणार एसटीच्या जादा गाड्या!​

दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये 131, जिल्हा परिषद क्षेत्रात 138, नगरपालिका क्षेत्रात 31 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 15 नवे रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 16 जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील 1, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 11, नगरपालिका कार्यक्षेत्रातील 1 आणि कॅंटोन्मेंट क्षेत्रातील 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही बुधवारी (ता.4) रात्री 9 वाजल्यापासून गुरुवारी (ता.5) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

US Election 2020: ट्रम्प मारू शकतात बाजी; मोठी आघाडी असूनही बायडेन यांच्यासमोर आव्हान​

आतापर्यंत एकूण 14 लाख 49 हजार 133 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यापैकी पुणे शहरातील 7 लाख 48 हजार 393 चाचण्यांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 4 लाख 13 हजार 883, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 2 लाख 5 हजार 376, नगरपालिका क्षेत्रात 63 हजार 201 आणि कॅंटोन्मेंट क्षेत्रात 18 हजार 280 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight thousand 16 corona patients have died in Pune district in a period of eight months